घरमहाराष्ट्रकेंद्रात असताना काँग्रेसने इंदूमिल स्मारकासाठी जागा दिली नाही, मोदींनी एका झटक्यात दिली...

केंद्रात असताना काँग्रेसने इंदूमिल स्मारकासाठी जागा दिली नाही, मोदींनी एका झटक्यात दिली – फडणवीस

Subscribe

इंदूमिल स्मारकासाठी मोदींनी एका झटक्यात २३ हजार कोटींची जागा दिली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते. पण, एक इंच जागा त्यांनी या स्मारकासाठी दिली नाही. इंदूमिल स्मारकासाठी आम्ही नरेंद्र मोदींकडे गेलो. त्यांनी तीन दिवसांत २३ हजार कोटींची जागा एका झटक्यात दिली, असं विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७२ फूट ‘स्टॅच्यु ऑफ नॉलेज’ पुतळ्याचे लातूर येथे लोकार्पण केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आणखी एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा योग आला, हे माझे भाग्य आहे. नागपुरात महापौर म्हणून दीक्षाभूमीची सेवा करण्याची संधी मला मिळाली. मुख्यमंत्री झाल्यावर इंदूमिल स्मारकाची पायाभरणी करता आली. नरेंद्र मोदी हे कायम सांगतात की, ते आज पंतप्रधान आहेत, कारण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. भारताचे संविधान हेच त्यांच्यासाठी गीता, बायबल आणि कुराण आहेत. त्या संविधानानुसारच ते सरकारचा कारभार चालवितात, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील राहते घर जेव्हा लिलावात निघाले, तेव्हा त्याला स्मारकात रुपांतरित करण्याची संधी आम्हाला मिळाली. त्यासाठी सुद्धा नरेंद्र मोदी यांची मदत मागितली आणि त्यांनी स्वत: तेथे भेट दिली. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे केवळ संविधाननिर्माते म्हणून नाही, अनेक अर्थांनी पाहिले पाहिजे. देशातील पहिला पाटबंधारे प्रकल्प त्यांनी साकारला. नदीजोड प्रकल्पाची संकल्पना त्यांची. वीजेची सिंगल ग्रीडची संकल्पना त्यांची. खर्‍या अर्थाने ते विश्वमानव आहेत, असं फडणवीस म्हणाले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील वास्तव्याच्या काळातील घर लिलावात निघाले, तेव्हा त्याला स्मारकात रुपांतरित करण्याची संधी आम्हाला मिळाली. त्यासाठी सुद्धा नरेंद्र मोदीजी यांची मदत मागितली आणि त्यांनी स्वत: तेथे भेट दिली.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -