घरमहाराष्ट्रफडणवीस साहेब तुमच्या घरात घुसलेल्या बाईचा आधी बंदोबस्त करा, सुषमा अंधारेंचा गृहमंत्र्यांना...

फडणवीस साहेब तुमच्या घरात घुसलेल्या बाईचा आधी बंदोबस्त करा, सुषमा अंधारेंचा गृहमंत्र्यांना टोला

Subscribe

देवेंद्र फडणवीस हे मी फडतूस नाही तर काडतूस आहे असा दम भरत आहेत. कुठे घुसेल तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही, असेही सांगत आहेत, त्या देवेंद्र भाऊंना माझं आवाहन आहे की तुमच्या घरात एक बाई २०१६ पासून घुसली होती, तिचा आधी बंदोबस्त करा, असा टोला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.

ठाणे – देवेंद्र फडणवीस हे मी फडतूस नाही तर काडतूस आहे असा दम भरत आहेत. कुठे घुसेल तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही, असेही सांगत आहेत, त्या देवेंद्र भाऊंना माझं आवाहन आहे की तुमच्या घरात एक बाई २०१६ पासून घुसली होती, तिचा आधी बंदोबस्त करा. तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात, पण तुमच्या घरात घुसलेल्या बाईचा तुम्हाला बंदोबस्त करता आला नाही, तेव्हा तुम्ही घुसण्याच्या बाता मारु नये, असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर केला आहे. त्यासोबतच ठाकरी बाणा ही तोफ आहे आणि तोफे समोर काडतूसाचा निभाव लागू शकणार नाही, असाही टोला त्यांनी फडणवीसांना लगावला आहे.

ठाण्यातील रोशनी शिंदे या युवा सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी आज (बुधवार) ठाण्यात महाविकास आघाडीचा जन प्रक्षोभ मोर्चा निघाला. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते.

- Advertisement -

गृहमंत्र्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत… 
माझा विवेक जागृत ठेवून अत्यंत शांतपणे मला काही प्रश्न सन्माननीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे या महिलेचं प्रकरण एका सोशल मीडियाच्या पोस्टवर ती काहीतरी कमेंट करते कमेंटला पुन्हा खाली रिप्लाय येतो प्रकरण चिघळत जातं, बायका तिच्यापर्यंत पोहोचतात तिला धमकावतात ती माफी मागते. त्यानंतर तिला माफीचा व्हिडिओ तयार करायला सांगितला जातो. ती माफीचा व्हिडिओ सुद्धा तयार करते आणि त्यानंतर सुद्धा तिच्या पोटात लाथा बुक्क्या मारल्या जातात. काही माध्यमांनी काल असं म्हटलं, की सदरील महिला ही गरोदर नाही. चला बाबा ती महिला गरोदर नाही, पण मग माध्यमांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी आणि सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावं की एखादी माय माऊली गरोदर नाही म्हणून तिच्या पोटात लाथा बुक्क्या मारण्याचे परमीट तुम्हाला मिळतं का? असा सवाल सुषमा अंधारेंनी केला.

‘तुमच्या घरात घुसलेल्या बाईचा आधी बंदोबस्त करा, मग काडतूसच्या बाता मारा’

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी फडतूस नाही तर काडतूस आहे. पण २०१६ ला तुमच्या घरामध्ये एक बाई घुसली तुमच्याच बायकोवर नजर ठेवून होती. ती कॅमेरा घेऊन आली, काय-काय रेकॉर्ड करून घेऊन गेली आणि तुम्हाला तर त्याचा पत्ताच नाही. तुम्ही काय घुसायची भाषा करता, असा सवाल सुषमा अंधारेंनी फडणवीसांना केला. मी जे काही बोलते ते सर्व सत्य आहे, कारण देवेंद्र फडणवीसांनीच हे सर्व सभागृहाच्या पटलावर ठेवलं आहे. देवेंद्र भाऊ २०१६ पासून तुमच्या घरात घुसलेल्या बाईचा आधी बंदोबस्त करा, आणि मग घुसण्याच्या बाता करा, असा टोला अंधारेंनी लगावला.

देवेंद्र फडणवीसांनी मी फडतूस नाही तर काडतूस असल्याचे काल नागपूरमध्ये म्हटले. त्याचाही समाचार अंधारेंनी घेतला. त्या म्हणाल्या. काडतूस म्हटले की आम्हाला ब्रिटीशांची आठवण होते. तोडा आणि फोडा ही नीति त्यांनी काडतूसांच्या माध्यमातून आणली. हिंदू-मुस्लिम दंगली आम्हाला आठवतात. भाजपला त्याची जास्त सवय आहे, त्यावर मी जास्त बोलणार नाही, असे म्हणत अंधारे म्हणाल्या, फडणवीस साहेब काडतुसाची भाषा जर तुम्ही करत असाल तर हा ठाकरी बाणा तोफ आहे. तोफेसमोर काडतूसाची काय निभाव लागणार, असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -