घरदेश-विदेश... म्हणून मी अमित शाहांना भेटले; प्रियंका चतुर्वेदींनी गृहमंत्र्यांच्या भेटीमागचे सांगितले कारण

… म्हणून मी अमित शाहांना भेटले; प्रियंका चतुर्वेदींनी गृहमंत्र्यांच्या भेटीमागचे सांगितले कारण

Subscribe

महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या भूमिकेबाबत अहवाल मागण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील संस्कार आणि संस्कृती कधीही महिलांबरोबरच्या अशा मारहाणीचे प्रकार सहन करणार नाही. मी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. यानंतर आता प्रियंका चतुर्वेदी यांनी यावर आता स्पष्टीकरण दिले आहे. त्या एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, मी अमित शाहांना म्हणाले की, महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या भूमिकेबाबत अहवाल मागण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील संस्कार आणि संस्कृती कधीही महिलांबरोबरच्या अशा मारहाणीचे प्रकार सहन करणार नाही. मी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.There is a need to ask for a report on the role of the Home Minister devendra Fadnavis in Maharashtra said by Priyanka Chaturvedi meet on Amit Shah pup

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, महाराष्ट्राचे गृहमंत्री अपयशी ठरले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना फटकारले आहे. संभाजीनगर दंगलीत कशी हिंसा झाली हे सर्वांनी पाहिले आहे. आता रोशनी शिंदेंना मारहाण झाली आहे. त्यांना मारहाण झाली याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलीस पीडित महिलेच्या मागे लागली आहे. ही कोणत्या प्रकारची कायद्याची स्थिती आणि कोणता न्याय आहे, असे प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.

- Advertisement -

( हेही वाचा: हे सरकार काही तासांचं, सगळ्यांचं मोजमाप करु; आदित्य ठाकरेंचा घणाघात )

मी अमित शहांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली आहे. त्यावर ते मला म्हणले की, आम्ही दोषींवर कारवाई करु. याबाबत त्यांनी मला आश्वासन दिले आहे. असेही चतुर्वेदी यावेळी म्हणाल्या. एका महिलेसाठी आई होणं सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. राजकीय मतभेद आहेत म्हणून सहा महिन्याच्या गर्भवती महिलेला मारहाण झाली. हे किती योग्य आहे. महाराष्ट्राची संस्कृती महिलांना अशाप्रकारे अपमानित करणे शिकवत नाही. आम्ही हे सहन करणार नाही. आम्ही आक्रोशित आहोत आणि त्याविरोधात मुंबईत मोर्चा निघत आहे, असे प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.

- Advertisement -

फडणवीसांचा राजीनामा घ्या

महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील घटनांकडे लक्ष नाही. पोलिसांनी त्यांचे काम केले पाहिजे आणि त्यांच्यावर कोणताही राजकीय दबाव येऊ नये. ज्यांनी हे काम केले त्यांना शिक्षा झाली पाहिजे. फडणवीस यांना पदावरुन हटवा, त्यांचा राजीनामा घेणं हेही योग्य ठरेल , असे त्या म्हणाल्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -