घरमहाराष्ट्रDevendra Fadnavis : तुम्ही डुप्लिकेट काम करू शकत नाहीत; फडणवीसांचा पुन्हा पवारांना टोला

Devendra Fadnavis : तुम्ही डुप्लिकेट काम करू शकत नाहीत; फडणवीसांचा पुन्हा पवारांना टोला

Subscribe

 

जळगावः तुम्ही डुप्लिकेट काम करु शकत नाहीत. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय, असं करता येणार नाही. शरद पवार यांनी 1978 मध्ये केलेले बंड हे मुत्सद्देगिरी ठरते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बेईमान म्हणता येणार नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

- Advertisement -

जळगाव येथे आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस म्हणाले, सन 1977-78 मध्ये शरद पवरा यांनी वसंतदादा पाटील यांच्या सरकारमधील 40 आमदार फोडले आणि सरकार पाडलं. तेच आता एकनाथ शिंदे यांना बेईमान कसे म्हणू शकतात.

हेही वाचाःKarni Sena Vs Bhim shakti : करणी सेना अध्यक्षाला भीम सैनिकांनी दिला चोप, पनवेल पालिकेतील घटना

- Advertisement -

मला कधी कधी राष्ट्रवादीच्या लोकांचे आश्चर्य वाटतं. ते आम्हाला बईमान म्हणत असतील तर त्यांनी 1977-78 मध्ये शरद पवारांनी जे केलं ते आठवाव. त्यावेळी शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री होते. ते 40 आमदारांना घेऊन बाहेर पडले. सरकार पाडलं. नंतर स्वतः मुख्यमंत्री झाले. तेव्हा शरद पवार यांनी बेईमानी केली, असं कोणी म्हटलं नाही. शरद पवार यांनी जे केलं त्याला मुत्सद्देगिरी म्हटलं. असं असेल तर एकनाथ शिंदे हे तर भाजपसोबत निवडणूक लढले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत जाण्याची उद्धव ठाकरे यांची भूमिका पटली नाही, म्हणून एकनाथ शिंदे बाहेर पडले. शिंदेसोबत 50 आमदार आले. शिंदे मुख्यमंत्री झाले. मग जर शरद पवारांचे बंड मुत्सद्देगिरी ठरते तर मुख्यमंत्री शिंदे यांचा निर्णयदेखील मुत्सद्देगिरीच ठरतो, असे फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले, जे लोक आता शिंदेंना बेईमान म्हणत आहेत. त्यांच्यापेक्षा बेईमानी महाराष्ट्रात कोणी केली नाही. अशा बेईमानांना महाराष्ट्रातील जनता नक्कीच जागा दाखवून देईल. कारण तुम्ही डुप्लिकेट वागू शकत नाहीत. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा देता येणार नाही.

अतिरेक्यांचा मोर्चा आहे का? राऊतांचा फडणवीसांना थेट सवाल

मुंबई महापालिकेवर निघणारा मोर्चा अतिरेक्यांचा आहे का? कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केली. संजय राऊत म्हणाले, मुंबईकरांचे प्रश्न घेऊन हा मोर्चा निघणार आहे. आम्ही अनेक घोटाळे बाहेर काढणार आहोत. या मोर्चाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यायला हवा. फडणवीसांना कायदा आणि सुव्यवस्था ठेवता येत नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही गृहमंत्री असाल तर आम्ही शिवसैनिक आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -