घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'झेडपी'चा महत्वाकांशी उपक्रम ‘सुपर 50’ साठी आॅनलाईन अर्जप्रक्रियेला सुरवात

‘झेडपी’चा महत्वाकांशी उपक्रम ‘सुपर 50’ साठी आॅनलाईन अर्जप्रक्रियेला सुरवात

Subscribe

नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या सुपर फिफ्टी या उपक्रमासाठी आता पर्यंत १८०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे यासाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे

सुपर ५० उपक्रमात सहभागी होण्यासाठी आता पर्यंत विद्यार्थ्यांनी तालुका पंचायत समितीमध्ये नाव नोंदविणे आवश्यक होते. मात्र, आता विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ऑनलाईन फॉर्म ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी क्यू.आर. कोड आणि ऑनलाइन फॉर्मची लिंक जिल्हा परिषद प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. 3 जुलै नोंदणीचा अंतिम दिनांक असून तो पर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सुपर फिफ्टी साठी नोंदणी करावी असे आवाहन आशिमा मित्तल यांनी केले आहे.

- Advertisement -

सीईओ मित्तल यांनी मंगळवारी (दि. 27) माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्या बोलत होत्या. सुपर फिफ्टीच्या पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आलेल्या 50 विद्यार्थ्यांची अकरावी पूर्ण झाली असून त्यांनी इयत्ता बारावीत प्रवेश केला आहे. पुढील वर्षी सुपर फिफ्टीतील विद्यार्थ्यांची जेईई, जेईई मेन्स, नीटची परीक्षा होणार असून या परिक्षेसाठी विद्यार्थी जोरदार तयारी करत असल्याची माहिती सीईओ मित्तल यांनी दिली.

फॉर्म भरण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनातर्फे  https://forms.gle/zkRRbs5MKq3et9i36 लिंक शेअर करण्यात आली असून सुपर 50 साठी इच्छुक विद्यार्थ्यांनी या लिंकवर क्लिक करावे असे आवाहन करण्यात आले आहे. सुपर ५० साठी प्रत्येक तालुक्यात परीक्षा केंद्र स्थापित करण्यात आले असून रविवार दि.9 जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत परीक्षा होणार आहे.

- Advertisement -

१८०० विद्यार्थ्यांची नोंद

सुपर फिफ्टी या उपक्रमासाठी दुसर्‍या टप्प्यात 800 विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे. सुपर 50 ची निवड परिक्षा 9 जुलै रोजी होणार असून जिल्हाभरातून 10 हजार विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा यासाठी जिल्हा परिषद प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्नरत आहे.

पेठ, बागलाणमधून सर्वाधिक नोंदणी

सुपर 50 साठी पेठ बागलाणमधून अनुक्रमे 200, 190 असा प्रतिसाद मिळत आहे. इतर जिल्ह्यांतून प्रतिसाद वाढावा यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने आॅनलाई अर्ज नोदंणीसाठी क्युआर कोड, कॉपी लिंक उपलब्ध करुन
दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -