घरमहाराष्ट्रअखेर सरपंचपदासाठी थेट निवडणूक

अखेर सरपंचपदासाठी थेट निवडणूक

Subscribe

निवडणूक आयोगाकडून निवडणूक वेळापत्रक जाहीर

राज्यातील १९ जिल्ह्यातील १ हजार ५७० ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच आणि सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २९ मार्च २०२० रोजी मतदान घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी केली. या निवडणुकीची मतमोजणी ३० मार्च २०२० रोजी होऊन निकाल जाहीर केले जातील.

राज्य सरकारने थेट सरपंच निवड रद्द केली आहे. मात्र, याबाबतचा अध्यादेश काढण्यास राज्यपालांनी नकार दिला आहे. त्यामुळे आयोगाने आधीच्या निर्णयानुसार सरपंचपदासाठी थेट निवडणूक जाहीर केली आहे. निवडणूक जाहीर झाल्याने संबंधित क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

- Advertisement -

एप्रिल २०२० ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणार्या आणि नव्याने स्थापित झालेल्या ग्रमपंचायत निवडणुकीसाठी ६ ते १३ मार्च २०२० या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. सरकारी सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणर नाहीत. अर्जांची छाननी १६ मार्चला होईल तर १८ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. २९ मार्च रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या दरम्यान मतदान होईल. गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची वेळी सकाळी साडेसात ते दुपारी ३ अशी राहणार असल्याचे आयोगाने सपष्ट केले आहे.

निवडणूक होणार्‍या ग्रमपंचायतींची जिल्हानिहाय संख्या
ठाणे-१३, रायगड-१, रत्नागिरी-८, नाशिक-१०२, जळगाव-२, अहमदनगर-२, नंदूरबार ३८, पुणे-६, सातारा-२, कोल्हापूर-४, औरंगाबाद-७, नांदेड-१००, अमरावती-५२६, अकोला-१ यवतमाळ-४६१, बुलढाणा-१, नागपूर-१, वर्धा- ३, गडचिरोली- २९६

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -