घरताज्या घडामोडीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परकीय चलनाची तस्करी, दोघेजण ताब्यात; महसूल गुप्तचर संचालनालयाची मोठी...

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परकीय चलनाची तस्करी, दोघेजण ताब्यात; महसूल गुप्तचर संचालनालयाची मोठी कारवाई

Subscribe

भारताबाहेर परकीय चलनाची तस्करी करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या प्रवाशांना आज(शुक्रवार) पहाटेच्या वेळी ताब्यात घेण्यात आले. हे दोघेजण शारजाहला जाण्याच्या तयारीत होते. परंतु त्यांची बॅग चेक केल्यानंतर त्यांच्या बॅगमध्ये ३.७ कोटी डॉलर मूल्याचे अमेरिकी डॉलर्स आणि सौदी दिऱ्हाम्स सापडले होते. विमानतळावर बॅग स्कॅनिंग करताना हे चलन सापडणार नाहीत. अशा प्रकारची सोय त्यांनी आधीच करून ठेवली होती.

परकीय चलन स्कॅनिंगमध्ये पकडले जाऊ नये, यासाठी त्यांनी बॅगेच्या तळाशी ते चलन लपवण्याचा प्रयत्न केला. परंतु या दोन्ही प्रवाशांकडे अवैध चलनासंदर्भात कायदेशीर पद्धतीने निर्यात दर्शवणारी कोणतीही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे या प्रवाशांकडून सीमाशुल्क कायदा १९६२ च्या कलम ११०अंतर्गत हे परकीय चलन हस्तगत करण्यात आले. त्यानंतर त्यांचा तपास देखील करण्यात आला. परंतु सीमाशुल्क कायद्यानुसार तस्करी व्यतिरिक्त परकीय चलनाची बेकायदेशीर निर्यात अवैध आणि गुन्हेगारी साधन मानले जाते. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

- Advertisement -

दरम्यान, देशाच्या अर्थव्यवस्थेला कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये. यासाठी परकीय चलन, सोने, अंमली पदार्थ भारतात आणि भारताबाहेर होणाऱ्या तस्करीला आळा घालण्यासाठी डीआरआय अतिशय दक्ष राहून प्रयत्न करत असते. परंतु गेल्या दीड महिन्यातील ही चौथी घटना समजली जात आहे.


हेही वाचा: इस्त्राईलनंतर बेल्जिअममध्ये कोविड-१९च्या नव्या व्हेरिएंटचं थैमान, भारतात अलर्ट जारी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -