घरमहाराष्ट्रहिवाळी अधिवेशनातही दिशा सालियन मृत्यूप्रकरणाची चर्चा; एसआयटीचे आदेश निघणार?

हिवाळी अधिवेशनातही दिशा सालियन मृत्यूप्रकरणाची चर्चा; एसआयटीचे आदेश निघणार?

Subscribe

दिशा सालियान मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिशा सालियान मृत्यू प्रकरण राज्यच्या राजकरणात चर्चेचा विषय बनला आहे. हे प्रकरण चर्तेत आले ते म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या SIT चौकशीमुळे. आदित्य ठाकरे यांची SIT चौकशी करणार येणार आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यात आहे.

शिवसेनेतील अंतर्गत फुटीनंतर शिवसेना पक्षाचे दोन गट झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेलेल्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांना दिशा सालियान प्रकणावरून टीका करण्याची सुरूवात केली. त्याचप्रमाणे भाजप आमदारांकडून सातत्यानं याप्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले जात आहेत. त्यानंतर आता दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी केली जाणार आहे.

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांची SIT चौकशी करा भाजपची मागणी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी वर्षभरापूर्वी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT करण्याचे आदेश दिले होते. तर दुसरीकडे दिशाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाच्या चौकशीला विरोध केला होता. कुटुंबीयांचं म्हणणं होत की, दिशाच्या मृत्यूची आधीच कसून चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एसआयटी लावून आमची मुलगी परत येणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करत दिशाच्या कुटुंबीयांनी एसआयटी चौकशीसाठी विरोध केला होता. त्याचप्रमाणे CBI ने केलेल्या तपासामध्ये दिशाचा मृत्यू इमारतीच्या बाल्कनीतून पडून झाल्याचं म्हटलं होतं. या प्रकरणामध्ये कोणताही राजकीय अँगल नसल्याचं देखील सीबीआच्या तपासामध्ये स्पष्ट झाले आहे. तरीदेखील आदित्य ठाकरे दिशा सालियनच्या मृत्यूच्या वेळी कुठे होते? असा प्रश्न सतत भाजप आमदरांकडून उपस्थित केला जात असाताना, सातत्यानं याप्रकरणी पुन्हा तपास करण्याची मागणी केली जात आहे. अशातच आता दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT आदित्य ठाकरेंची चौकशी करणार आहे.

- Advertisement -

दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर सातत्यानं आरोप

दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने आरोप केले जातात. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांचं लोकेशन ट्रेस करा, त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सातत्यानं सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. राणे कुटुंबीयांनी तर या प्रकरणात थेट आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जातोय. परंतु, ठाकरे कुटुंबीयांकडून मात्र या प्रकरणी संयमाची भूमिका घेतली जातेय. आरोप-प्रत्यारोप होत असतानाच साधारणतः वर्षभरापूर्वी या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत केली जाईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. अशातच आता याप्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी केली जाणार आहे.

दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला?

8 जून 2020 रोजी दिशा सालियनचा मुंबईतील मालाड येथील इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. आणि त्यानंतर 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत यांने त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र सुशांतच्या मृत्यूवर नंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. दिशा सालियान मृत्यू प्रकरण आणि सुशांत सिंह राजपूतच मृत्यू प्रकरणाशी जोडलं गेलं. रिपोर्टसनुसार देशा ने आत्महत्या केली होती, मात्र यामागे षडयंत्र असल्याच आरोप अनेकांनी केला आहे.

दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नक्की काय झाल?

दिशा सालियनच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यू झालं आहे अशी नोंद केली होती. त्यानंतर ऑगस्ट 2021 मध्ये पोलिसांनी या प्रकरणी क्लोजर रिपोर्टही दाखल केला होता. पोलिसांनी याप्रकरणाचा तपासही बंद केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा सालियन मृत्यूप्रकरणात कटाचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. त्यानंतर सीबीआयने देखिल दिशा सालियानचा मृत्यू अपघात असल्याचं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे दिशा सालियान च्या मृत्यू झाला त्या दिवशी दिशा नशेत होती आणि तोल गेल्यानं छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला. अस सीबीआय तपासात समोर आलं होतं. या प्रकणामध्ये कोणताही राजकीय अँगल नाही.

दिशा सालियन कोण आहे?

दिशा ही अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची मॅनेजर होती. 8 जून 2020 ला मुंबईमध्ये घराच्या बालकनीमधून खाली पडून दिशा सालियानचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येची नोंद केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूपूर्वी दिशानं आपल्या लंडनमधील एका मैत्रिणीला फोन केला होता. आपल्या मैत्रिणीशी बोलताना दिशा थोडी चिंतेत वाटत होती. वर्कलोड जास्त असल्याचं तिनं आपल्या मैत्रिणीला सांगितलं होतं. त्यानंतर थोड्याच वेळात तिचा होणारा नवरा रोहन यानं दिशा ज्या खोलीत राहात होती, त्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र दिशा त्या खोलीमध्ये नव्हती. त्यानं खिडकीतून खाली पाहिलं, तेव्हा त्याला दिशा बालकनीतून खाली पडलेली दिसली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -