घरमहाराष्ट्रसमाजीक यंत्रणेला सुधारण्यासाठी दुसऱ्याकडे बोट का दाखवता - गडकरी

समाजीक यंत्रणेला सुधारण्यासाठी दुसऱ्याकडे बोट का दाखवता – गडकरी

Subscribe

आपल्या वादग्रस्त विधांनांमुळे चर्चेत असलेले केंद्रिय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एक विधान केले आहे. आयबीचे ३१ वे व्याख्यान कार्यक्रमादरम्यान गडकरी बोलत होते.

आपल्या वादग्रस्त विधांनांमुळे चर्चेत असलेले केंद्रिय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एक विधान केले आहे. देश म्हणजे काय तर समाज, समाज म्हणजे काय अनेक व्यक्ती, या व्यक्तिंमध्ये जर चांगले गुण येतील तर त्यांचा विकास होईल आणि हा विकास समाज आणि देशाचाही असेल. त्यामुळे सामाजीक यंत्रणेला सुधरवण्यासाठी दुसऱ्याकडे का बोट दाखवता असा प्रश्न गडकरी यांनी केला आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू म्हणालेले की,”या देशाचा प्रत्येक व्यक्ती हा देशासमोर असलेला एक प्रश्न आहे.” मला त्यांचे भाषण आवडतात असं गडकरी म्हाणाले. आयबीचे ३१ वे व्याख्यान कार्यक्रमादरम्यान गडकरी बोलत होते.

- Advertisement -

काय म्हणाले गडकरी

जर मी पक्षाचा अध्यक्ष असेल आणि माझ्या पक्षातील आमदार आणि खासदारांनी चांगले प्रदर्शन केले नाही याला जवाबदार कोण असेल असे म्हणत गडकरी यांनी निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या पराभवाबद्दल बोलले. मागील काही दिवसांमध्ये नितिन गडकरी यांचे वादग्रस्त विधाने चर्चेत होते. “कोणी चांगले म्हणून निवडणूक जिंकली जाऊ शकत नाही. तुम्ही कितीही विद्वान असाल तरीही लोक तुम्हाला मत देणार नाहीत. असे कोणी विचार करत असेल तर तो चुकीचा आहे. विश्वास आणि गर्वात फरक आहे. तुम्हाला विश्वास ठेवला पाहिजे मात्र अहंकार जवळ बाळगून फायदा नाही.” – गडकरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -