Coronavirus: सरकारी, खासगी कार्यलयातील एसी बंद ठेवा

एसीमध्ये करोनाचे विषाणू अधिक काळ जिवंत राहतात. या कारण्यामुळे आरोग्य विभागाने सरकारी आणि खासगी कार्यलयात एसी बंद ठेवण्याची सूचना दिली आहे.

use caution in using ac cooler keep room temperature between 24 to 30 celsius
CoronaVirus: कोरोनापासून बचाव करण्यासाठी एसीचे तापमान २४ ते ३० डिग्री दरम्यान ठेवा!

करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्यातील सर्वच सरकारी कार्यालयांनी वातानुकूलीत यंत्रणेचा (एसी) शक्यतो वापर टाळावा, अशी सूचना आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी सर्व शासकीय विभागांना दिल्या आहेत. एसीमध्ये करोनाचे विषाणू अधिक काळ जिवंत राहतात. त्यामुळे एसी यंत्रणा शक्यतो बंद ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाने जारी केल्या आहेत.

वातानुकूलित यंत्रणेचा वापर कमी करण्यास बजावले

करोनाचे विषाणू हे शिंकणे आणि खोकण्यामधून सर्वत्र पसरतात. विषाणू धुलीकणांसोबत वस्तूच्या पृष्ठभागावर राहतात. कमी तापमान असलेल्या कक्षात ते अधिक काळ जिवंत राहतात. त्यामुळे सरकारी कार्यालयात वातानुकूलित यंत्रणेचा वापर बंद करावा किंवा अपवादात्मक स्थितीमध्ये त्याचा वापर करावा. केंद्र सरकारने करोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात वातानुकूलित यंत्रणेचा वापर कमी करण्यास बजावले आहे, असे आरोग्य विभागाच्या परिपत्रात नमूद केले आहे.

वातानुकूलित यंत्रणांचा वापर कमी करण्याची वेळ

या सूचना सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणू न द्याव्यात, असे आवाहन विभागाने केले आहे. आता सरकारी कार्यालयाप्रमाणेच खासगी आस्थपनांनी आणि नागरिकांनी आपल्या घरातील वातानुकूलित यंत्रणांचा वापर कमी करण्याची वेळ आली असून त्याची अंमलबजावणी राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये केली जावी, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.


हेही वाचा – करोना अपडेट – राज्यात ४८ करोना पॉझिटिव्ह, मुंबईत ९ जणांवर उपचार