घरमहाराष्ट्रवाढदिवशी कोणीही भेटायला येऊ नका !

वाढदिवशी कोणीही भेटायला येऊ नका !

Subscribe

शरद पवार व्हर्च्युअल रॅलीतून साधणार संवाद

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची वयाची 81 वर्षे पूर्ण होत आहे. कोरोना असल्यामुळे शरद पवार कुणाकडूनही प्रत्यक्ष शुभेच्छा स्वीकारणार नाहीत. ‘व्हर्च्युअल रॅली’च्या माध्यमातूनच ते संवाद साधणार आहेत. त्यामुळे 12 डिसेंबर रोजी त्यांना भेटण्यासाठी कुणीही येऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल रॅली ही मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचे पालन करून रविवार 12 डिसेंबर रोजी नेहरु सेंटर वरळी येथे सकाळी 11 ते 1 या वेळेत पार पडणार आहे. वाढदिवसानिमित्त होणारी ही अभूतपूर्व व्हर्च्युअल रॅली पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेज व युट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

- Advertisement -

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी पक्षाच्यावतीने नवीन उपक्रमाची घोषणा करत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. पक्ष संघटना व कार्यकर्ते यांच्यातील समन्वय अधिक सक्षम होण्याकरिता एका महत्वाच्या अ‍ॅपचे उद्घाटन होणार असून विद्यार्थी संघटनेला ‘महाराष्ट्र युथ कार्निव्हल’ असा आगामी काळाकरिता विशिष्ट कार्यक्रम देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -