घरमहाराष्ट्रदुष्काळी दौरा : "सरकारला वेळ देऊ, मदत झाली नाही तर...", उद्धव ठाकरेंचा इशारा

दुष्काळी दौरा : “सरकारला वेळ देऊ, मदत झाली नाही तर…”, उद्धव ठाकरेंचा इशारा

Subscribe

अहमदनगर : सरकारला वेळ देऊ, मदत झाली नाही तर आंदोलन करणार, असा इशारा ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. उद्धव ठाकरे हे दुष्काळी भागा दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे आज अहमदनगर येथील वडझरीतील खुर्दमधील दुष्काळी भागाची पाहाणी केली आणि शेतकऱ्यांकशी संवाध साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी धीर दिला.

शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्ही कोणी धीर सोडू नका. संपूर्ण शिवसेना ताकदीने तुमच्यासोबत आहेत. सरकारला एक मुदत देऊ. यात नाही झाले, तर मग आपण आंदोलन असेल, जे काय करावे लागेल, ते करून.” यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना शेतकऱ्यासोबत राहा. शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे कधी सुरू होणार आहेत. यासंदर्भात मला माहिती द्या किंवा पंचनामे करायला लोक येतात की नाही येतात. विम्याचे पैसे मिळतात, नाही मिळत. मला 5 ते 10 लोक घेऊन मुंबईत भेटा आणि सरकारकडून काय हालचाली होतात ते पाहू या. “, यासंदर्भात मला माहिती द्यावी.

- Advertisement -

हेही वाचा – Maratha Reservation: लढा आणखी व्यापक होणार; मराठा तरुणांनो…, काय म्हणाले जरांगे पाटील

उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांची साधला संवाध

उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना विचारले की, तुम्हाला या मौसमात किती वेळा पेरणी कराव्या लागल्यात, या प्रश्नावर शेतकरी म्हणाले, दोन वेळा पेरणी करावी लागली. पुढे उद्धव ठाकरे म्हटले की, तुम्ही दोन वेळा पेरणी केली. तुमच्या डोक्यावर पुन्हा कर्ज चढले. पिक विम्याचे तुम्ही हपते भरले होते का?, तुम्हाला आता विम्याचे पैसे मिळालेत का?, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना विचारल्यावर ते म्हणाले, “शेतकऱ्यांनी स्पष्टपणे नाही”, असे उत्तर दिले. गेल्या वर्षीची नुकसान भरपाई मिळालेली नाही, असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -