घरमहाराष्ट्रपोलीस स्टेशनमध्ये पोलीस शिपाईला मारहाण

पोलीस स्टेशनमध्ये पोलीस शिपाईला मारहाण

Subscribe

पोलीस स्टेशनमध्ये पोलीस शिपायाला मारहाण केल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्याने त्याच्या वडिलांनी पोलिसांविषयी गैरसमज करून घेतला. दारूच्या नशेत मुलाच्या वडिलांनी पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. साहेब गौडा पाटील असे आरोपीचे नाव आहे. त्यांचा मुलगा भरधाव वेगात ट्रिपलसीट दुचाकी घेऊन जात होता. दुचाकी भरधाव वेगात असल्यामुळे अपघात झाला. यात तिघेही रस्त्यावर पडले. अपघातात एक लहान मुलगा बचावला. या अपघातानंतर परिसरातील नागरिकांना राग अनावर न झाल्याने त्यांनी गाडीवर बसलेल्या तिन्ही  मुलांना चोप दिला. बचावासाठी त्यामधील एकाने शंभर नंबरवर कॉल करत पोलिसांना बोलावून घेतले. त्यानंतर पोलीस चौकीत वडिलांनी पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करत धक्काबुक्की केली.


हेही वाचा – भाजपच्या नगरसेवकाची पोलिसाला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण?

सविस्तर माहिती अशी की, रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास १७ वर्षीय मुलगा आणि त्याचे दोन मित्र भरधाव वेगात ट्रिपल सीट दुचाकी चालवत होते. भरधाव वेगात असलेल्या दुचाकीचा अपघात झाला. यात एक लहान मुलगा थोडक्यात बचावला. गाडीवर बसलेले तिघेही रस्त्यावर पडले. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी तिघांना चोप दिला. नागरिकांचा रोष पाहून तिघांपैकी एकाने मोबाईलवर शंभर क्रमांकावर कॉल करत पोलिसांना बोलावून घेतले. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहेचले आणि त्यांनी तिघांना नवी सांगवी पोलीस चौकी येथे घेऊन गेले. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रार घेण्यात आली. परंतु दुचाकी चालवणार मुलगा हा अल्पवयीन होता. त्यामुळे त्याच्या वडिलांना पोलिसांनी बोलावले.

अपघातात १७ वर्षीय मुलगा किरकोळ जखमी झाला होता. त्याचे वडील साहेब गौडा पाटील हे पोलीस चौकीत आले असता मुलाला किरकोळ जखम दिसली. पोलिसांनीच आपल्या मुलाला मारहाण केली असा गैरसमज करून त्यांनी थेट पोलीस कॉन्स्टेबल बाळू गंगाराम सुपे यांना शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली.ते दारूच्या नशेत असल्याने अचानक खाली बसले.सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निकुंभ हे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -