घरमहाराष्ट्र‘माथेरानची राणी’ बंद,शहरातील व्यवसाय थंड

‘माथेरानची राणी’ बंद,शहरातील व्यवसाय थंड

Subscribe

रेल्वे प्रशासनाला स्थानिकांचे साकडे

‘माथेरानची राणी’ म्हणून ओळखली जाणारी मिनिट्रेन अतिवृष्टीच्या तडाख्याने बंद असल्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांचा पुरता हिरमोड झाला आहे. गाडी बंद झाल्यामुळे शहरातील विविध व्यवसायांच्या संधी कमी झाल्या आहेत, त्यामुळे येथील आर्थिक उलाढालीला मंदी आली आहे. पण रेल्वे प्रशासनाला ही ट्रेन सुरू होण्यासाठी वेगाने हालचाली कराव्या, असे वाटत नाही. त्यामुले ती सुरू करण्यासाठी स्थानिकांनी रेल्वेच्या अधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.

माथेरानमध्ये दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. त्यांना मिनिट्रेन हा एकमेव आधार असल्याने ट्रेन कायम हाऊसफुल असते. पर्यटकांची ‘आवडती राणी’ असाही या ट्रेनचा उल्लेख होत असतो. अलिकडे झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे जागोजागी दरडी पडल्या व काही भागात रूळाखालील जमीन वाहून गेल्यामुळे ट्रेन बंद झाली. स्वाभाविक पर्यटकांची संख्या रोडावण्याबरोबर शहरातील व्यवसायावर गदा आली. त्यामुळे ट्रेनची सेवा कधी पूर्ववत होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने सर्व राजकीय पक्ष, संस्था, व्यक्ती एकत्र येत रेल्वेला निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

त्यानुसार सोमवारी डीआरएम कार्यालयात संजीवकुमार जैन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले. रेल्वेच्या अधिकार्‍यांनी याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास माथेरानकर आंदोलनाचा मार्ग हाताळतील, असा इशारा नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी दिला आहे. तर जैन यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाल्यामुळे येत्या चार ते पाच महिन्यात ट्रेन पूर्ववत होईल, असा विश्वास माजी नगराध्यक्ष मनोज खेडेकर यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -