घरमहाराष्ट्रकाँग्रेसलाही टेन्शन नाराजी सत्राचे

काँग्रेसलाही टेन्शन नाराजी सत्राचे

Subscribe

निवडणुकीत फटका बसू नये म्हणून श्रेष्ठींचे प्रयत्न सुरु

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने दोन यादी जाहीर केल्यानंतर आता अनेक जागांविरोधात नाराजी सत्र सुरु झाल्याचे चित्र मुंबईत पाहायला मिळाले आहे. मुंबईतील काही जागांविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे धाव घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात बंडखोरी टाळण्याबरोबरच निवडणुकीत अंतर्गत गटबाजीचा फटका बसू नये, म्हणून काँग्रेस पक्षश्रेष्ठींसमोर नवे आव्हान असणार आहे. दरम्यान, अनेक बड्या नेत्यांच्या उमेदवारांनाही विरोधाचा झेंडा दर्शविण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.

काँग्रेसकडून मंगळवारी रात्री उशीराने दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. तत्पूर्वी पहिल्या यादीत ही महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांची जाहीर करण्यात आली आहेत. एकीकडे लोकसभा निवडणुकीत पराभवास सामना करावा लागल्यानंतर आता सगळ्यांचे लक्ष या विधानसभा निवडणुकीकडे लागून राहिले आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन पक्षश्रेष्ठींनी केले होते. मात्र, त्यानंतरही यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपानंतर काँग्रेसला नाराजीनामा सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काँग्रेसने वांद्रे पूर्व येथे बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी दिली आहे. या विरोधात काँग्रेसच्या सफाई कामगार सेलकडून विरोध करण्यात आला असून तसे पत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. राजेश रिडलान यांनी हे पत्र जाहीर केले असून त्यांच्या पत्रकानुसार काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत कोणत्याही नेत्यांच्या मुलांना तिकीट देऊ नये अशी मागणी केली होती,त्याला सकारात्मक पवित्रा देखील दर्शविला होता. त्यानंतरही काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्याने त्यांनी याविरोधात नाराजी व्यक्त करीत आपली भूमिका मांडली आहे.

- Advertisement -

त्याशिवाय मुंबईतील काँग्रेसचे मोठे नेते भाई जगताप यांना देखील पक्षांकडून कुलाबा येथून तिकीट जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीला देखील नाराजी वर्तविण्यात आली असल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबई महानगरपालिकेचे काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी विरोध दर्शविल्याचे कळते. निकम यांनी गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी पक्षबांधणी केली होती. मात्र पक्षातर्फे त्यांना डावलून भाई जगताप यांना उमेदवारी जाहीर केल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -