घरमहाराष्ट्रपालघरमध्ये ४.८ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के; जीवितहानी नाही

पालघरमध्ये ४.८ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के; जीवितहानी नाही

Subscribe

पालघर जिल्ह्यातील काही भागात आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पालघर जिल्ह्यातील काही भागात आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहे. या भूकंपाच्या धक्क्यांनी पालघर हादरुन केले असून रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.८ इतकी नोंदली गेली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गेल्या वर्षांपासून या परिसरात भूकंपाचे हादरे बसत आहेत.

- Advertisement -

जीवितहानी नाही

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी या भागात आज सकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी भूकंपाचा मोठा धक्का बसला. यानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण पसरले असून येथील स्थानिक रहिवाशांमध्ये एकच घबराट निर्माण झाली आहे. ४.८ रिश्टर स्केलचा हा भूकंप असल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाच्या धक्क्याने डहाणू तालुक्यातील काही घरांच्या भिंतीला भेगा गेल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील डहाणू भागात भूकंपाचे लहान – मोठे धक्के बसत आहेत. त्यामुळे रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.


हेही वाचा – अजित पवारांच्या मर्जीतील कंपनीला पालिकेकडून धक्का

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -