घरमहाराष्ट्रराऊत हे राजकीय व्यक्तिमत्व असल्याने त्याचा प्रभाव तपासावर पडू शकतो; ईडी वकिलांचा...

राऊत हे राजकीय व्यक्तिमत्व असल्याने त्याचा प्रभाव तपासावर पडू शकतो; ईडी वकिलांचा न्यायालयात युक्तिवाद

Subscribe

राऊतांनी पडद्याआड राहून काम केले असल्याचे पुरावे सापडले असे ईडीने या आरोपपत्रात नमूद केले आहे.

शिवसेनेचा(shivsena) आवाज अशी ओळख असलेले संजय राऊत यांच्या विरोधात मुंबईतील(mumbai) गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या पुनर्विकासाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय राऊत यांचा केवळ सहभाग नसून त्यात राऊतांची महत्वाची भूमिका सुद्धा आहे. राऊतांनी पडद्याआड राहून काम केले असल्याचे पुरावे सापडले असे ईडीने या आरोपपत्रात नमूद केले आहे. त्याच बरोबर संजय राऊत यांना जामीन मिळविण्यासाठी विरोध करत ईडीने स्पष्ट केले की, संजय राऊत(sanjay raut) हे एक राजकीय व्याक्तीमत्व आहे. आणि त्यांचा राजकारणातला एकूण प्रभाव बघता, त्याचा परिणाम पुराव्यांवर होऊ शकतो. त्यामुळे तपास महत्वाच्या टप्प्यावर आलेला असताना राऊतांना जमीन देणं योग्य ठरणार नाही.

हे ही वाचा –  Sanjay Raut : भोंगे लावून केलेली कामं सांगणार, राज ठाकरे आणि भाजपला राऊतांचा टोला

- Advertisement -

शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत(sanjay raut) यांना 31 जुलै रोजी रात्री ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊतांना आधी ईडी आणि मग न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. संजय राऊतांनी जामीनासाठी मुंबई(mumbai) सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयातसुद्धा धाव घेतली. त्या याचिकेवर न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी झाली असून सोमवारी संजय राऊतांची पुढची रिमांड आणि जामीन अर्जावर एकत्रित सुनावणी होण्याचा अंदाज आहे. दरम्यान संजय राऊत यांच्यावरील कारवाई ही द्वेषा भावनेतून किंवा राजकीय सूड घेण्यासाठी झाली नसल्याचं स्पष्ट करत राऊतांचा दावा ईडीने नाकारला.

हे ही वाचा – Sanjay Raut: तुरुंगात जाण्याचीही तयारी; कारवायांचं संकट, आमच्यासाठी संधी – संजय राऊत

- Advertisement -

दरम्यान खासदार संजय राऊत( shivsen mp sanjay raut) यांची पत्नी वर्षा राऊत(varsha raut) यांच्या बँक खात्यातील 1 कोटी 8 लाखांचा व्यवहारदेखील संशयास्पद आहे असे ईडीने कोर्टाला सांगितले. असेच अनेक संशयास्पद आर्थिक व्यवहार ईडीला सापडले. या संशयास्पद व्यवहाराचा तपास ईडीला करायचा आहे. असे ईडीच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले. संजय राऊत हे अत्यंत प्रभावशाली राजकीय व्यक्तीमत्व आहे त्यामुळे तपासात आणि साक्षीदारांवर त्याचा प्रभाव पडू शकतो. असं ईडीच्या वकिलांनी कोर्टात सांगितले.

हे ही वाचा – Sanjay Raut : कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर.., खासदार संजय राऊतांनी दिलं ट्विट करून स्पष्टीकरण

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -