घरमहाराष्ट्रऐन थंडीत अंडी महाग, एका अंड्यासाठी मोजावे लागणार आता इतके रुपये

ऐन थंडीत अंडी महाग, एका अंड्यासाठी मोजावे लागणार आता इतके रुपये

Subscribe

हिवाळ्यात अंडी खावी असा सल्ला अनेकांना डॉक्टरांकडून किंवा आहार तज्ज्ञांकडून दिला जातो. मात्र ऐन थंडीच अंडी महागली आहे. त्यामुळे अंड्यांसाठी तुम्हाला आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. अंडी ही उष्ण असल्याने थंडीत अंडी खाण्याचे प्रमाण वाढते. कडाक्याच्या थंडीत अंडी खाल्याने शरीराचे तापमान नियंत्रणात राहते. प्रति डझन अंड्याच्या दरात 6 रुपयांची वाढ झाली आहे.

थंडीत भारतासह परदेशातही अंड्याची मागणी वाढल्याने देशांतर्गत अंड्यांची किंमत पाचपटीने वाढली आहे. भाताने अंडे निर्यातीत आघाडी घेतली आहे. बाजारातील तज्ज्ञानुसार, भारतीय अंडे सर्वात महागडे उत्पादन ठरले आहे. कारण इंग्लंड आणि मलेशियातील (England And Malaysia) अंडे विक्रीत घट झाल्याने भारतीय अंड्यांना प्रचंड मागणी आली आहे. यामुळे भारतीय अंड्याची निर्यात 10 टक्क्यांनी वाढली आहे. चीन अंडी उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र जगभरात अंड्याच्या किंमतीत वाढ होत असल्याने आता दर महिन्यात या किंमती 125 टक्क्यांनी वाढत आहेत. दरवर्षी भारतात 11,440 कोटी अंड्यांचे उत्पादन केले जाते.

- Advertisement -

यात कतारमधील फीफा वर्ल्ड कपमुळे भारतीय अंडे निर्यात तेजीत आहे. भारतातून सध्या 40 कंटेनर भरुन पाठविण्यात येत आहे. पूर्वी कतारला केवळ 10 कंटेनर जात होते. यामुळे भारतात अंड्यांची कमतरता भासण्याची शक्यता आहे. परिणामी अंड्यांच्या किमती वाढल्या आहेत.

अंड्यांची मागणी वाढल्याने दोन कंपन्यांच्या शेअर्समध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. यात Venkys आणि SKM Eggs या कंपन्यांचे शेअरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच या कंपन्यांचे शेअर येत्या दिवसात वाढू शकतात.

- Advertisement -

वेंकिज कंपनीचे शेअरमध्ये आज 229.10 रुपये अथवा 12.63% वृद्धी दिसून येत आहे. आज 2,043 रुपये प्रति शेअरवर हा बंद झाला. तर SKM Eggs मध्ये 6.50 रुपये अथवा 4.97% वृद्धी होईल. सध्या हा शेअर 137.30 रुपयांवर बंद झाला आहे.


हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक होणार पास; हालचालींना वेग

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -