घरमहाराष्ट्रनागपूरEknath Khadse : तातडीने पीकविमा मिळण्याबाबत निर्णय घेणार का? खडसेंच्या प्रश्नाला कृषी...

Eknath Khadse : तातडीने पीकविमा मिळण्याबाबत निर्णय घेणार का? खडसेंच्या प्रश्नाला कृषी मंत्र्यांकडून उत्तर

Subscribe

नागपूर : राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, परंतु अद्यापही सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिलेला नाही. त्यामुळे आज विधान परिषदेच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा विरोधकांनी सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पीक विम्यासंदर्भात प्रश्न विचारले, या प्रश्नांना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले आहे. (Eknath Khadse Will you take a decision on getting crop insurance immediately? Answer from Agriculture Minister Dhananjay Munde to Eknath Khadse question​)

राज्यात दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे, याचपार्श्वभूमीवर एकनाख खडसे यांनी आज विधान परिषदेच्या तिसऱ्या दिवशी सभागृहात प्रश्न उपस्थित केले की, जळगाव सोबत अनेक भाग आहे की केळी पिक विम्या संदर्भात सरकार निर्णय घेणार आहे का? तातडीने पिक विमा मिळण्याबाबत सरकार काही निर्णय घेणार का?

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : नरेंद्र मोदी अन् अमित शहा यांना दाऊदचे हस्तक…; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

धनंजय मुंडे म्हणाले की, एकनाथ खडसे काही महिने कृषी मंत्री राहिले आहेत. या वर्षी 130 टक्के जास्त केळ्यांची लागवड झाली आहे, परंतु अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी पुन्हा सर्व्हेक्षण करावी अशी मागणी केली आहे. यानुसार पुन्हा सर्वेक्षण होईल आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीकविमा मिळेल. केळी करता 255 कोटी वाटप झाले आहेत. जळगावमध्ये नुकसान भरपाई रक्कम 500 कोटींपेक्षा जास्त आहे तर वाटप रक्कम 225 कोटी आहे.

- Advertisement -

आजपर्यंत पिकविमा कंपणींन्यांनी शेतकऱ्याला विमा टाळायचा प्रयत्न केला, पण या सरकारमध्ये असं झालं नाही. शेतकऱ्यांचे 25 टक्के नुकसान झाले आहे. 5 मंडळांची पाहणी केली आहे. पण विरोधी पक्षनेते प्रश्न विचारून निघून गेले आहेत, उत्तर मिळेपर्यंत थांबायचे असते, पण विरोधी पक्ष नेत्यांना गांभीर्य नाही आहे. म्हणून विरोधी पक्ष बाहेर गेले पण कृषी मंत्री म्हणून मला गांभीर्य आहे म्हणुन मी उत्तर देतोय, असा टोला धनंजय मुंडे यांनी अंबादास दानवे यांनी लगावला.

हेही वाचा – Amit Thackarey : शर्यतीत विजेत्या बैलांवर उधळला गुलाल; हे पाहून अमित ठाकरे धावत गेले अन्…

दरम्यान, राज्यातील 24 जिल्ह्यात 1297 मंडळ नुकसान भरपाईसाठी पात्र ठरले आहेत. 24 नोव्हेंबर अखेर 45.77 लाख एवढे शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 साठी पात्र आहेत. या शेतकऱ्यांना 2026.17 कोटी नुकसान भरपाई द्यायची आहे. या पैकी 1036.80 कोटी वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी सभागृहात दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -