घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरगंगापूर शहरातील पाणी प्रश्नाबाबत तरुणाचे थेट पंतप्रधानांना पत्र, मी भाजपच्या उमेदवाराला...

गंगापूर शहरातील पाणी प्रश्नाबाबत तरुणाचे थेट पंतप्रधानांना पत्र, मी भाजपच्या उमेदवाराला…

Subscribe

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर (Gangapur) शहरातील पाणी प्रश्नाबाबत तरुणाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. गंगापूर शहरात पाणीबानी असून शहराला 15 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये नगरपालिकेविषयी असंतोष वाढला असून अनेक तक्रारी होऊनही नगरपरिषद लक्ष देत नसल्याने शहरातील पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. शहरात होत असलेल्या पाणीबाणीमुळे अजय कुलकर्णी (Ajay Kulkarni) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहीत मी बाजापाच्या उमेदवाराला मत का देऊ असा सवाल केला आहे. (Yuth direct letter to the Prime Minister regarding the water issue in Gangapur city I am writing to the BJP candidate)

अजय कुलकर्णी यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीलगंगापूर या माझ्या मतदारसंघात पाणीपुरवठ्याच्या सततच्या टंचाईबद्दल मी आज अत्यंत विनम्रतेने आणि जड अंतःकरणाने तुम्हाला पत्र लिहित आहे. गेल्या आठ वर्षांपासून स्थानिक नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही नागरिकांना अडचण ठरणाऱ्या या गंभीर समस्येवर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. जायकवाडी धरणाचे बॅकवॉटर गंगापूरपासून फक्त 6 किमी अंतरावर आहे. तिथून सध्याचा पाणीपुरवठा सुरू आहे. तुम्हाला माहिती असेलच की, प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि जगण्यासाठी पाणी हा एक आवश्यक स्त्रोत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यासमोर शिवसेनेच्या दोन्ही गटांचं आंदोलन; कार्यकर्त्यांकडून किल्ल्यात प्रवेशाचा प्रयत्न

दुर्दैवाने आमच्या मतदारसंघातील रहिवाशांना पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीचा दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. पाणीपुरवठ्याच्या अभावामुळे वैयक्तिक स्वच्छतेसह नागरिकासमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. आंघोळ करणे, कपडे धुणे आणि घरातील स्वच्छता राखणे यासारख्या मूलभूत स्वच्छता करणे कठीण काम बनले आहे. स्त्रिया आणि मुले विशेषतः असुरक्षित आहेत, कारण त्यांना दूरच्या स्त्रोतांमधून पाणी आणण्यासाठी लांब अंतर चालावे लागते.

- Advertisement -

हेही वाचा – ‘सरकार औटघटकेचं असल्यामुळे बडबडत असतील’; फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्यावर राऊतांचा टोला

अनेक वेळा मागणी करूनही नगरपालिका या समस्येवर निर्णायक कारवाई करण्यात अपयशी ठरली आहे. याप्रकरणी नगरपरिषद प्रशासनाकडे चौकशी केली असता पुरेसा वीजपुरवठा नाही किंवा मोटर खराब आहे. या कारणांमुळे 8-10 दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जातो. पुरवठा केलेले पाणी अशुद्ध असून वापरण्या योग्य नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या जबाबदारीचा अभाव आणि उदासीनता यामुळे रहिवाशांमध्ये नैराश्य आणि निराशेची भावना अधिकच वाढली आहे.

हेही वाचा – पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांचा आणखी एक गौप्यस्फोट, म्हणाले…

तुमच्या हस्तक्षेपाशिवाय अजिंक्य वाटणाऱ्या पाण्याच्या संकटाशी आम्ही झगडत आहोत. त्यामुळे या प्रकरणात आपण त्वरित लक्ष घालावे आणि हस्तक्षेप करावा ही विनंती करतो. तुम्ही तुमच्या आदरणीय कार्यालयाचा आणि प्रभावाचा वापर करून आमच्या मतदारसंघातील सततच्या पाणीटंचाईची चौकशी सुरू करा व संबंधित अधिकार्‍यांना परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी, मूळ कारणे ओळखण्यासाठी निर्देश द्या. ज्याचे निदान सामान्य माणूस देखील करू शकतो. आपल्या महान राष्ट्राच्या नागरिकांच्या कल्याणासाठी आपल्या वचनबद्धतेवर पूर्ण विश्वास आहे. या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी तुमची निर्णायक कृती निःसंशयपणे आमच्या मतदारसंघातील रहिवाशांचे दुःख कमी करेल आणि त्यांचा आमच्या लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा निर्माण होईल. गेल्या काही वर्षांपासून हा मुद्दा उपस्थित केला जात आहे, असेही कुलकर्णी यांनी म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -