घरमहाराष्ट्रEknath Shinde : एकनाथ शिंदेंची लोकप्रियता घटली; टॉप टेन मुख्यमंत्र्यांच्या यादीत 'या'...

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची लोकप्रियता घटली; टॉप टेन मुख्यमंत्र्यांच्या यादीत ‘या’ क्रमांकावर

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. ‘इंडिया टुडे सी व्होटर्स’ सोबत ‘मूड ऑफ द नेशन’ (Mood of the Nation) द्वारे देशभरातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांबाबत नुकताच एक सर्व्हे घेण्यात आला. या सर्व्हेत देशातील लोकप्रिय टॉप दहा मुख्यमंत्र्यांची यादी समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान राखता आले नाही. या सर्व्हेत त्यांना देशभरातील केवळ 1.9 टक्के लोकांनीच पसंती दर्शवली आहे. (Eknath Shinde Eknath Shinde popularity declined Eknath Shinde is at number eight in the list of top ten chief ministers)

हेही वाचा – Ajit Pawar : ‘राज्यपाल भेटीनंतर काही होत नाही’; ठाकरेंच्या वक्तव्यावर अजित पवारांचा दुजोरा

- Advertisement -

‘इंडिया टुडे सी व्होटर्स’ सोबत ‘मूड ऑफ द नेशन’ (Mood of the Nation) द्वारे देशभरातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या सर्व्हेत योगी आदित्यनाथ लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या स्थानी आहेत. त्यांना 46.3 लोकांनी पसंती दर्शवली आहे. मात्र त्यांच्या लोकप्रियता घसरली आहे. यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेत योगी आदित्यनाथ यांना 43 टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली होती.

योगी आदित्यनाथ यांच्यानंतर दुसऱ्या क्रमाकांवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आहेत. त्यांना 19.6 लोकांनी पसंती दर्शवली आहे. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना 8.4 टक्के लोकांची पसंती दर्शवली आहे. चौथ्या क्रमांकावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन हे आहेत. त्यांना 5.5 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांना 2.5 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

- Advertisement -

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे सहाव्या  आहेत. त्यांना 2.3 टक्के लोकप्रियता दर्शविली आहे. तर आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्व सरमा हे सातव्या क्रमांकावर आहेत. त्यांना 2 टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे. यानंतर आठव्या क्रमांकावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नंबर लागतो. त्यांना 1.9 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना 0.5 टक्के, तर सगळ्यात शेवटी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल हे आहेत. त्यांना 0.4 टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे.

हेही वाचा – Wadettiwar Vs Bangar : संतोष बांगर यांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला अन् वडेट्टीवारांचा संताप…

एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता घटली

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे आवडते मुख्यमंत्री आहेत, अशी जाहीरात करण्यात येत असली तरी ‘इंडिया टुडे सी व्होटर्स’ सोबत ‘मूड ऑफ द नेशन’ने केलेल्या सर्व्हेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता घटल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे हे शेवटून तिसरे स्थानावर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे टेन्शन वाढणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -