घरताज्या घडामोडीदेशातील टॉप १० मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर; एकनाथ शिंदे कितव्या स्थानावर?

देशातील टॉप १० मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर; एकनाथ शिंदे कितव्या स्थानावर?

Subscribe

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतमध्ये घसरण झाल्याची माहिती समोर येत आहे. नुकताच India Today-C Voter ने 'मूड ऑफ नेशन' नावाने सर्व्हे केला. या सर्वेक्षणानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशातील टॉप १० मुख्यमंत्र्यांच्या यादीत आठव्या स्थानावर आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतमध्ये घसरण झाल्याची माहिती समोर येत आहे. नुकताच India Today-C Voter ने ‘मूड ऑफ नेशन’ नावाने सर्व्हे केला. या सर्वेक्षणानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशातील टॉप १० मुख्यमंत्र्यांच्या यादीत आठव्या स्थानावर आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना अद्याप मुख्यमंत्री म्हणून राज्यातील जनतेने मनापासून स्वीकारले नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे. (Eknath Shinde On 8th Rank In Top 10 Cm List Mood Of Nation India Today C Voter Survey)

India Today-C Voter ने केलेल्या ‘मूड ऑफ नेशन’ या सर्वेक्षणात देशातील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ३९ टक्के लोकांनी पसंती दिली असून ते पहिल्या क्रमांकावर आहेत. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आठव्या क्रमांकावर आहेत. एकनाथ शिंदेंना केवळ २.२ टक्केच लोकांनी पसंती दिली आहे.

- Advertisement -

या सर्वेक्षणात देश ते राज्य पातळीवरील राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करण्यात आले आहे. तसेच, देशातील टॉप १० मुख्यमंत्री कोण, यासाठी जनतेकडून कौल घेण्यात आला.

दरम्यान, कोरोना काळात ‘मूड ऑफ नेशन’कडून सर्वेक्षण केले जात होते. त्यावेळी सर्वेक्षणात सातत्याने टॉप १० मुख्यमंत्र्यांच्या म्हणजेच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे अग्रेसर असायचे. परंतु, ‘मूड ऑफ नेशन’च्या यंदाच्या टॉप १० मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे यांचा आठवा क्रमांक आहे. भाजपाने अनेक राजकीय गणितांचा विचार करुन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवले होते.

- Advertisement -

टॉप १० मुख्यंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे हे जवळपास तळाला आहेत. त्यामुळे लोकप्रियतेच्या बाबतीत एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा फिके पडत आहेत का, असा सवाल निर्माण झाला आहे. तसेच, राज्यात आता लोकसभेची निवडणूक झाल्यास युपीएला ३४ जागांवर विजय मिळेल असे India Today-C Voter ने केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे.

शिवसेनेतील ४० आमदार फोडून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांना अद्याप जनतेनी आपले केल्याचे दिसत नाही. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदे यांनी अनेक घोषणा केल्या आहेत.


हेही वाचा – प्रकाश आंबेडकर भाजपासोबतही राजकीय समझौता करायला तयार, पण घातली ‘ही’ अट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -