घरठाणेEknath Shinde : 'शरद पवार बोलतात त्याच्या नेमका उलटा अर्थ घ्यायचा', मुख्यमंत्री...

Eknath Shinde : ‘शरद पवार बोलतात त्याच्या नेमका उलटा अर्थ घ्यायचा’, मुख्यमंत्री असं का म्हणाले…

Subscribe

Eknath Shinde : शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) वक्तव्याला दुजारा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) कुठलीही फुट पडलेली नाही. आमच्यापैकी काही लोकांनी एक वेगळा निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या निर्णयाबद्दल आम्ही लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे, असे शुक्रवारी सकाळी वक्तव्य केले होते. मात्र शुक्रवारी दुपारी यू-टर्न घेत शरद पवार म्हणाले की, ज्यांनी वेगळा निर्णय घेतला आहे त्यांना पुन्हा पक्षात संधी नाही. पक्ष एकसंध असल्याचे सांगत अजित पवारांसाठी पक्षाचे दार बंद झाल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले होते. याच वक्तव्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, शरद पवार बोलतात त्याच्या नेमका उलटा अर्थ घ्यायचा असतो. एकनाथ शिंदे आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ठाण्यात शक्तिस्थळावर समाधीचे दर्शन दर्शन घेण्यासाठी गेले होते. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना वक्तव्य केलं आहे. (Eknath Shinde Sharad Pawar should take the exact opposite meaning of what he says why did the Chief Minister say that)

हेही वाचा – Eknath Shinde : मविआच्या काळात यंत्रणाचा दुरुपयोग, खोटे आरोप करून…; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

- Advertisement -

एकनाथ शिंदे म्हणाले की, मी सुद्धा ऐकलं शरद पवार सकाळी एक म्हणाले आणि नंतर दुपारी दुसरं म्हणाले. शरद पवार मोठे नेते आहेत. त्यामुळे ते जे बोलतात त्याच्या नेमका उलट अर्थ घ्यायचा असतो, असा टोला लगावला आहे. यावेळी अजित पवारांच्या बंडखोरीवर बोलताना म्हणाले की, मोदी सरकारच्या कामगिरीवर विश्वास व्यक्त करत अजित पवार यांनी आमच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे. चांद्रयान-3 मोहिम यशस्वी झाली आहे. महासत्तेकडे आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे. त्याकडे एक पाऊल पडलं आहे. त्यामुळे अजित पवारांनाही पटलं आहे आणि हळूहळू शरद पवारांनी पटेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – अजित पवारांचा निर्णय विकासासाठी, ‘इंडिया’ आघाडीनेही घेतली दखल; सुनील तटकरेंचा हल्लाबोल

- Advertisement -

विरोधक एकत्र आले तरी…

‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील बैठकीवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, बैठक कुठेही झाली कितीही लोक आले, तरी या देशातील लोकांनी मोदींचं नेतृत्व स्वीकारले आहे. 2014 साली सुद्धा असेच सगळे एकत्र आले होते. 2019 साली सुद्धा एकत्र आले. त्यामुळे कितीही विरोधक एकत्र आले तरी 2024 साली सगळे विक्रम मोडीत निघतील आणि जनता मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवेल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

सीबीआयने दूध का दूध आणि पाणी का पाणी केले

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात खोटे आरोप करून अनेक बड्या नेत्यांचे राजकीय आयुष्य उद्धवस्त करण्याचा प्लॅन होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे, गिरीश महाजन, खासदार नवनीत राणा आणि अभिनेत्री कंगना रनौट यांच्यावर खोटे आरोप करत गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांना गुन्ह्यात अडकविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, याची मला चांगली माहिती आहे. सत्तेचा व यंत्रणेचा सर्रासपणे गैरवापर ठाकरे सरकारच्या काळात झाल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. पण सीबीआयने तपास करून दूध का दूध आणि पाणी का पाणी केले आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा – CBI Clean Chit : आज क्लिनचीट दिली तरी…; रश्मी शुक्ला प्रकरणी नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

सरकार स्थापनेपासून पदाधिकारी, नगरसेवकांचा पक्षात ओध सुरूच

दरम्यान, धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज एकनाथ शिंदे यांनी शक्तिस्थळावर समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी धर्मवीर आनंद दिघेंच्या पुण्यतिथीनिमित्त 25 रुग्णवाहिका वेगवेगळ्या भागामध्ये गरजूंसाठी दिलेल्या आहेत. मागणीप्रमाणे राज्यभर अशा रुग्णवाहिका आणखी देण्यात येतील. मुंबई मधले राज्यामधले अनेक पदाधिकारी ,नगरसेवक पक्षात येत आहेत. सरकार स्थापन झाल्यापासून हा ओघ सुरूच आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -