घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रतलाठी भरतीचा पेपर फोडणारा आरोपी गणेश गुसिंगे झाला स्पर्धा परिक्षा पास

तलाठी भरतीचा पेपर फोडणारा आरोपी गणेश गुसिंगे झाला स्पर्धा परिक्षा पास

Subscribe

वैद्यकिय शिक्षण भरती प्ररिक्षेत गुसिंगेला १३८ गुण, भरती प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह

नाशिक : तलाठी भरती परीक्षेचा पेपर फुटीचा आरोप असलेला मुख्य संशयित गणेश गुसिंगे हा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत पास झाल्याचे समोर आले आहे. या भरतीच्या परीक्षेमध्ये गणेश गुसिंगेला 138 गुण प्राप्त झाले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याची भावना स्पर्धा परिखा देणारया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

नाशिकमध्ये तलाठी भरतीचा पेपर फोडणार्‍या गणेश गुसींगेला वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या भरती परीक्षेच्या जाहीर झालेल्या यादीत 138 गुण मिळाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याची निवड होऊ शकते. गणेश गुसिंगे हाच पिंपरी चिंचवड पोलिस भरती आणि म्हाडाच्या पेपरफुटीमध्येही आरोपी आहे. आरक्षण आणि पेसा कायद्यातील तरतुदींमुळे अडकून पडलेल्या तलाठी भरती परीक्षेला मुहूर्त लागला आणि 17 ऑगस्टपासून या परीक्षेला सुरुवात झाली. 4 हजार 466 जागांसाठी तब्बल 10 लाख 41 हजार 713 उमेदवारांनी यासाठी अर्ज केला. राज्यभरात ही परीक्षा ऑनलाईन सुरु आहे, मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये हायटेक कॉपीचा प्रकार समोर आला आणि पोलीस चक्रावून गेले.

- Advertisement -

तीन सत्रात ही परीक्षा पार पडत असतानाच पहिल्या सत्रात नाशिकच्या म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेब ईझी या परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु होती. दरम्यान यावेळी काही जण कॉपीसारखा प्रकार करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच केंद्राबाहेर संशयास्पदरित्या फिरणार्‍या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली आणि केंद्रावर हायटेक कॉपी सुरु असल्याचे समोर आले. एक टॅब, एक वॉकी टॉकी, दोन मोबाईल फोन आणि हेडफोन असे साहित्य जप्त करत मूळच्या छत्रपती संभाजीनगरच्या गणेश गुसिंगे नावाच्या तरुणाला अटक केली.

दरम्यान मंगळवारी न्यायालयात सरकारी पक्षाने आपली बाजू मांडताना गणेशचे आणखी तीन साथीदार असून शहर पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर आहे. त्याने वनरक्षक परीक्षेत परीक्षार्थींना मदत केली असावी असा संशय व्यक्त केला. विशेष म्हणजे त्याचा मोबाईल रिसेट असल्याने गोपनीय माहितीही मिळू शकलेली नाही. तसेच या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असू शकते, त्यामुळे सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली. तर बचाव पक्षाने गणेश गुसिंगे बहिणीला तलाठी परीक्षेसाठी घेऊन आला होता. पोलिसांच्या तपासात प्रगती नसून बहीण परीक्षेचा अभ्यास करत असल्याने अभ्यासासंदर्भात माहिती मोबाईलमध्ये होती असे म्हटले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत आरोपी गणेश गुसिंगेला 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -