घरठाणेEknath Shinde : मविआच्या काळात यंत्रणाचा दुरुपयोग, खोटे आरोप करून...; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

Eknath Shinde : मविआच्या काळात यंत्रणाचा दुरुपयोग, खोटे आरोप करून…; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

Subscribe

Eknath Shinde : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना फोन टॅपिंग प्रकरणी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात यंत्रणाचा मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग झाला आहे. राज्यातील काही नेत्यांवर खोटे आरोप करण्यात आले. त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न झाला. भाजपा (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना तुरुंगात टाकण्यासाठी त्यांच्यावरही खोटे आरोप करण्यात आले, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिंदे गटातील आमदारांसह ठाण्यातील आनंद मठ येथे उपस्थित होते. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना गौप्यस्फोट केला आहे. (Eknath Shinde Misuse of torture, making false allegations Chief Ministers whistleblowing)

हेही वाचा – CBI Clean Chit : आज क्लिनचीट दिली तरी…; रश्मी शुक्ला प्रकरणी नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

- Advertisement -

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना तुरूंगात टाकण्यासाठी महाविकास आघाडीच्या काळात अनेक खोटे आरोप खोट्या कारवाया करण्यात आल्या होत्या. सीबीआयने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणात फडणवीसांना क्लीनचीट दिली आहे. म्हणजे त्यावेळी महाविकास आघाडीने केलेले आरोप पूर्णपणे खोटे होते, असे म्हणायचे का? असा प्रश्न उपस्थित कतराना एकनाथ शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात फडणवीसांवर आरोप करून खटला भरण्यात आला होता. असे अनेक प्रकार मविआच्या काळात घडले आहेत, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला.

नारायण राणे, गिरीश महाजन, नवनीत राणा यांच्यावरही खोटे आरोप

एकनाथ शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात खोटे आरोप करून अनेक बड्या नेत्यांचे राजकीय आयुष्य उद्धवस्त करण्याचा प्लॅन होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे, गिरीश महाजन, खासदार नवनीत राणा आणि अभिनेत्री कंगना रनौट यांच्यावर खोटे आरोप करत गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांना गुन्ह्यात अडकविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, याची मला चांगली माहिती आहे. सत्तेचा व यंत्रणेचा सर्रासपणे गैरवापर ठाकरे सरकारच्या काळात झाल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. पण सीबीआयने तपास करून दूध का दूध आणि पाणी का पाणी केले आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – काँग्रेसला मोठा धक्का; पाच माजी नगरसेवक शिंदे गटात करणार प्रवेश

जनता विरोधकांना धडा शिकवेल

महाविकास आघाडीच्या काळात यंत्रणाचा मोठ्या दुरूपयोग झाला आहे. आज कोण कोणावर आरोप करत आहे, हे राज्यातील जनता बघत आहे. परंतु सीबीआयच्या चौकशीमुळे ही बाब आता उघड झाली आहे. राज्यातील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे येत्या काळात जनताच त्यांना धडा शिकवेल, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -