घरमहाराष्ट्रसरकारमुळे वीज ग्राहकांच्या सेवेत सुधारणा

सरकारमुळे वीज ग्राहकांच्या सेवेत सुधारणा

Subscribe

सरकार सत्तेत आल्यापासून वीज धोरणात मोठा बदल केल्याने ग्राहकांच्या सेवेत प्रचंड सुधारणा झाल्याची माहिती राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात नवे सरकार सत्तेत आल्यापासून वीज धोरणात मोठा बदल केल्याने ग्राहकांच्या सेवेत प्रचंड सुधारणा झाल्याची माहिती राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ऊर्जा विभागाच्या चार वर्षांतील वाटचालीचा आढावा घेण्यासाठी पाठक यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली.
पाठक यांनी सांगितले की, नवे सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांनी विजेशी संबंधित चारही कंपन्यांनी नेमके काय करायचे, याविषयी निर्देश दिले होते. त्यानुसार ग्राहकांना सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी धोरण निश्चित केले. ग्राहकांच्या सेवेत सुधारणा करणे, वीज न पोहचलेल्या ठिकाणी वीज पोहचविणे, शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून काम करणे व विजेचे दर निश्चित करणे इत्यादी कामांवर भर देण्यात आला.

काय म्हणाले पाठक

पाठक म्हणाले, पूर्वी कृषिपंपांची वीजमागणी १८ हजार मेगावॉट होती. आता ती २५ हजार मेगावॉट झाली आहे. ग्राहकांची संख्या ही २ कोटी १५ लाखांवरुन २ कोटी ५० लाखांवर पोहचली आहे. ऊर्जा विभागाने सर्व सुरळीत केले, असा दावा आम्ही करीत नाही; मात्र, बऱ्याचअंशी चांगले काम केले. हे करीत असताना यंदा २९ ऑक्टोबरला ग्राहकांनीच आमची परीक्षा घेतली. अचानक २४ हजार ९०० मेगावॉट विजेची मागणी आली आणि कुठेही खंड न पाडत महावितरणने ती पूर्ण केली, असे पाठक यांनी सांगितले.

- Advertisement -

खर्चात झाली बचत

पूर्वी कोळसा एकीकडचा आणि वीजनिर्मितीसाठी तो पोहचवायचा दूरपर्यंत, अशी स्थिती होती. त्यात ऊर्जा विभागाने बदल करुन जवळचा कोळसा वापरण्यास सुरुवात केली. शिवाय थर्ड पार्टी डिमांड लावली. यामुळे खर्चात मोठी बचत झाली. महावितरणला साडेसहा रुपयांत मिळणारी वीज शेतकऱ्यांना दीड रुपये प्रतियुनिट या दराने द्यावी लागते. वीज वापरणारे ग्राहक ६० टक्के असून, एकूण विजेच्या ३५ टक्के वापर शेतीसाठी होतो. परंतु कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडून होणाऱ्या वसुलीचे प्रमाण अत्यल्प आहे, असे पाठक यांनी मान्य केले.

गावात वीज पोहोचली

राज्यात सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत दोन पायलट प्रोजेक्ट सुरु झाले असून, त्याद्वारे शेतीला दिवसाही वीज मिळेल. सरकार येताच आम्ही साडेचार लाख वीजजोडण्या दिल्या. २०१७ पर्यंत गडचिरोली व नंदूरबार जिल्ह्यांतील काही गावे वगळता उर्वरित सर्व ठिकाणी वीज पोहचविल्याचा दावा विश्वास पाठक यांनी केला. गडचिरोली जिल्ह्यातील ६५८ गावांमध्ये वीज जोडण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

पुढे काम चांगलं होईल

राज्यात कुठेही वीजमीटरचा तुटवडा नाही. आतापर्यंत गडबड असलेले १६ लाख मीटर बदल केले. १३३ ग्रामविद्युत सहायकांची भरती केली. त्यांना प्रशिक्षण देणे सुरु असून, पुढे काम चांगलं होईल, असा विश्वास पाठक यांनी व्यक्त केला. ६२५ गावांमध्ये महाऊर्जा विभागाच्या वतीने सोलर कनेक्शन देण्याचे काम सुरु असल्याची माहिती देऊन पाठक यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -