घरमहाराष्ट्रआर्थिक विवंचनेतून वडिलांची आत्महत्या

आर्थिक विवंचनेतून वडिलांची आत्महत्या

Subscribe

पाच दिवसांवर मुलीचे लग्न आले तरी देखील आर्थिक अडचण दूर होत नसल्याने अखेर वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.

आर्थिक विवंचनेतून वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. त्यांच्या मुलीचे लग्न पाच दिवसाच्या तोंडावर आले असताना त्यांनी आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले आहे. नागेश काशिनाथ आठवले (४०) असे त्यांचे नाव आहे. मुलीचे लग्न जवळ आले तरी देखील पैशांची अडचण दूर होत नसल्याने नागेश आठवले यांनी आत्महत्या केली आहे.

नेमके काय घडले ?

औरंगाबादमध्ये राहणारे नागेश आठवले हे मजुरीचे काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. येत्या १८ नोव्हेंबर रोजी त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न करण्याचे ठरले होते. अवघ्या पाच दिवसांवर त्यांच्या मुलीचे लग्न आले तरी देखील लग्नाच्या खर्चाचा प्रश्न सुटला नव्हता त्यामुळे ते गेल्या अनेक दिवसांपासून चिंतेत होते. अखेर त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी रात्री घरी कोणीही नसताना त्यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती सिडको पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी नागेश यांना घाटीत रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तसेच नागेश आठवले यांनी ही आत्महत्या आर्थिक विवंचनेतून केली असल्याची शक्यता आठवले यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

संबंधित बातम्या –

वाचा – धक्कादायक: स्वतःची चिता रचून शेतकरी महिलेनी केली आत्महत्या

वाचा – ‘लिव्ह इन’ लग्नास नकार; तरुणीची आत्महत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -