घरदेश-विदेशधर्म प्रचारामुळेच त्या अमेरिकी पर्यटकाची हत्या ?

धर्म प्रचारामुळेच त्या अमेरिकी पर्यटकाची हत्या ?

Subscribe

जॉनला मारले त्याच्या आदल्या दिवशीही त्याच्यावर हल्ला झाला होता. त्यात तो थोडक्यात बचावला होता. त्याने त्याआधी त्याचा एक फोटो देखील शेअर केला. त्यावेळी च्याच्या एका हातात मासा आणि दुसऱ्या हातात बायबल होते.

अंदमान- निकोबार बेटावर गेलेल्या एका पर्यटकाची तेथील आदिवासींनी बाण मारुन हत्या केल्याचे समोर आले होते. या हत्येशी निगडीत७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पण आता या हत्येसंदर्भातील एका नवा खुलासा समोर आला आहे. मारला गेलेला अमेरिकन पर्यटक जॉन अॅलन चाऊ हा ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी तो तेथे गेल्याचा खुलासा एका पत्रातून झाला आहे.

वाचा नेमकी घटना काय ?  

काय आहे या पत्रात ?

चाऊ याने १६ नोव्हेंबर रोजी त्याने एक पत्र त्याच्या पालकांना लिहिले होते. त्यात त्याने लिहिले होते की, प्राण धोक्यात घालून माझे येथे येणे तुम्हाला वेडेपणाचे वाटेल.पण या लोकांना (सेंटिनेल आदिवासींना) येशूचा संदेश पोहोचवण्यासाठी धोका पत्करायलाच हवा असे मला मनापासून वाटते. हे करताना माझे प्राण गेले तर त्या आदिवासींवर किंवा देवावर रागावू नका त्यांचा काहीच दोष नाही, मी जे करतो ते निरर्थक नाही.प्रत्येकाने आपआपल्या भाषेत प्रभूची उपासना करावी, असे बायबलमध्ये लिहिले आहे. हे आदिवासीही त्यांच्या भाषेत देवाची पूजा करतात. मला तेच पाहायचे आहे, असे त्याने पत्रात लिहिले आहे.

- Advertisement -

आणखी ही मिळाली टिपणे

जॉनला मारले त्याच्या आदल्या दिवशीही त्याच्यावर हल्ला झाला होता. त्यात तो थोडक्यात बचावला होता. त्याने त्याआधी त्याचा एक फोटो देखील शेअर केला. त्यावेळी च्याच्या एका हातात मासा आणि दुसऱ्या हातात बायबल होते. त्यावेळी काय झाले हे त्याने लिहून ठेवले होते. जॉनला या बेटावर जाण्यासाठी मच्छिमारांनी मदत केली होती. त्यांना अटक करण्यात आले असून त्याच्याकडे जॉनच्या हस्ताक्षरात लिहिलेली काही टिपणेदेखील मिळाली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -