घरमहाराष्ट्रएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर

एल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Subscribe

भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणी सुधा भारद्वाज यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. हायकोर्टाने भारद्वाज यांचा जामीन मंजूर केला आहे. त्याचवेळी इतर आठ जणांना जामीन नामंजूर करण्यात आला आहे. ८ डिसेंबर रोजी भारद्वाज यांना विशेष एनआयए कोर्टासमोर हजर केलं जाईल. त्यानंतर त्यांना काही अटीशर्तीसंह जामीनावर सोडलं जाईल.

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने मात्र या प्रकरणातील सुधीर ढवळे, महेश राऊत, व्हर्नन गोन्साल्विस, अरुण फरेरा, रोना विल्सन, शोमा सेन, सुरेंद्र गडलिंग आणि वरावरा राव यांचा जामीन अर्ज फेटाळला.

- Advertisement -

सुधा भारद्वाज यांच्यावर ‘शहरी नक्षली’ असल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिसांनी त्यांना भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात ६ जून २०१८ ला अटक केली. त्यांच्यासह अन्य काही वकील, लेखक आणि मानवी हक्क कार्यकर्त्यांनाही अटक करण्यात आली होती. पुणे पोलीस या प्रकरणाची चौकशी करण्यात उशीर करत आहेत. त्यामुळे त्यांच्या एकूण कार्यपद्धतीवरच अनेक प्रश्नं उपस्थित होत होते.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -