घरमहाराष्ट्रमुक्त विद्यालयाच्या प्रवेश अर्ज भरण्यास मुदतवाढ

मुक्त विद्यालयाच्या प्रवेश अर्ज भरण्यास मुदतवाढ

Subscribe

विद्यार्थ्यांना नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी १ ते ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. https://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळातर्फे इयत्ता पाचवी ते आठवीसाठी नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाकडून ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी १ ते ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. https://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

विविध कारणास्तव अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही. यापार्श्वभूमीवर शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना दूरस्थ पद्धतीने शिक्षण घेता यावे यासाठी राज्य मंडळाकडून मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळांतर्गत पाचवी ते आठवीला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना १ ते ३१ डिसेंबरपर्यंत नाव नोंदणी अर्ज करता येणार होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीव प्रवेश घेण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेता या विद्यार्थ्यांना नाव नोंदणी अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्वीकारण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी १ ते ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्र अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये २ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत जमा करायचे आहेत. तसेच संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे ५ फेब्रुवारीपर्यंत जमा करायची आहे. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना https://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध केल्या असून, त्या वाचून अर्ज भरावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -