घरमहाराष्ट्रतुरुंगातील चांगल्या व्यवस्थेसाठी 'अतिरेकी' असणे गरजेचे; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

तुरुंगातील चांगल्या व्यवस्थेसाठी ‘अतिरेकी’ असणे गरजेचे; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Subscribe

मुंबई : तुरुंगातील चांगल्या व्यवस्थेसाठी अतिरेकी असणे गरजेचे आहे, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांनी सामनाच्या दिवाळी अंकात तुरुंगातील त्यांचा अनुभव एक भाग सांगितला आहे. संजय राऊतांच्या तुरुंगातील अनुभवाचे पुस्तक लवकर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामुळे आता संजय राऊत यांच्या पुस्तकामध्ये काय-काय गौप्यस्फोट करणार, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

सामनाच्या दिवाळी अंकात संजय राऊतांनी ‘कसाबच्या यार्डा’त या शिर्षक असलेला लेख लिहला आहे. जेलमध्ये एकंदरीत व्यवस्थेत भ्रष्टाचार नाही तर भ्रष्टाचार हित एकमेव भ्रष्टाचार आहे, असा दावा संजय राऊतांनी लेखात केला आहे. संजय राऊत यांना 1 ऑगस्ट 2022 रोजी ईडीने अटक केली आहे. यानंतर संजय राऊत हे तब्बल 100 आर्थर रोड जेल दिवस काढले आहे. या 100 दिवसाचा अनुभव सांगितला आहे. तरुंगात कैदाना मिळणाऱ्या सुविधा आणि त्यासाठी त्यांना कसे झगडावे लागते. या लेखात संजय राऊतांनी स्वत:घेतलेला अनुभव मांडलेला आहे. तुरुंगात सुविधा मिळवण्यासाठी भ्रष्टाचार ही एकमेवर व्यवस्था आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आरक्षणाच्या वादात शंभूराज देसाईंची उडी, म्हणाले – “भडक वक्तव्य करण्याची भुजबळांची जुनी सवय”

अतिरेक्यांना योग्य आहार पण…

यात अंकात कसाब, अबू सलेम आणि जिंदल यांना योग्य आहार मिळतोय. हे मानवाधिकार संस्था पहात होत्या. यामुळे तुम्हाला तुरुंगातील चांगल्या व्यवस्थेसाठी अतिरेकी असणे हे गरजेचे आहे. तरुंगातील सामान्य कैद्यांना सुविधा मिळत नाही. पण कसाब जिंदल आणि अबू सलेम यांना सुविधा मिळतात. पण सामन्य कैद्यांचे प्रचंड हाल असतात. मग डॉक्टर, जेवण अन्य मूलभूत सुविधांसाठी कैद्यांना कसे झगडावे लागते. ज्या कैद्याची आर्थिक परिस्थिती चांगली असेल, तो या सुविधा मिळवू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -