घरमहाराष्ट्रFace to face : तुम्हा 'तिघांचे' किस्से लोकांना ज्ञात आहेत, ठाकरे गटाचे...

Face to face : तुम्हा ‘तिघांचे’ किस्से लोकांना ज्ञात आहेत, ठाकरे गटाचे फडणवीस यांना प्रत्युत्तर

Subscribe

मुंबई : भाजपा आणि ठाकरे गटात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. संधी मिळेल तेव्हा दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करत आहेत. काल, गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, फेसबुकवर बोलणारे हे सरकार नाही, तर हे सरकार फेस टू फेस बोलणारे आहे, असे वक्तव्य केले होते. त्याला, तुमच्या तिघांचे किस्से लोकांना ज्ञात आहेत, असे प्रत्युत्तर ठाकरे गटाने दिले आहे.

 

- Advertisement -

शिर्डीतील काकडी गावात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम काल, गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारच्या काराभाराचे कौतुक करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटावर उपोधिक टीका केली. आम्ही जनतेपर्यंत पोहोचलो आहोत. पुढेही पोहोचत राहणार आहोत. निश्चितपणे जनतेच्या जीवनात परिवर्तन करणारे हे सरकार आहे. नवीन सरकारने आणलेल्या योजना अनेकांपर्यंत पोहोचत आहेत, असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – शरद पवारांसमोर मराठवाड्यातील दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना बळ देण्याचे आव्हान

- Advertisement -

मिशन मोडवर सरकार काम करत आहे. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम केवळ कार्यक्रमापुरता मर्यादित नाही. वर्षाचे 365 दिवस हे सरकार जनतेच्या दारी जात राहणार आहे. 36 जिल्ह्यांतही कार्यक्रम होणार आहेत. हे लोकांपर्यंत जाणारे सरकार आहे. कारण हे बंद दाराआड काम करणारे सरकार नाही तर, हे फेस टू फेस बोलणारे सरकार आहे. हे फेसबुकवर बोलणारे सरकार नाही, असा अप्रत्यक्ष टोला फडणवीसांना ठाकरेंना लगावला होता.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फडणवीस यांच्या टीकेवर पलटवार केला आहे. ‘फेस टू फेस’ सरकार असल्याचे सोडून बोला. सरकारचे कारभारी अर्थात तुमच्या तिघांचे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) किस्से लोकांना ज्ञात आहेत. ‘फेस टू फेस’ होते तर, मग तुम्हाला हुडी घालून रात्रीच्या वेळी बाहेर का पडावे लागत होते? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे.

हेही वाचा – मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित; विद्यार्थी संघटना आक्रमक, नेमकं घडलं काय?

‘फेस टू फेस’ होते तर काकांना भेटून बाहेर पडताना अजित पवार यांना गाडीत आडवे झोपून का जावे लागले? ‘फेस टू फेस’ होते तर मविआ सरकार पाडण्यासाठी रुग्णवाहिकेत बसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुरत का गाठावी लागली? असे बोचरे सवालही विरोधी पक्षनेते दानवे यांनी केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -