घरमतप्रवाहबैठकीतच दहीहंडी समन्वय समिती कोसळली; उरला आरोप-प्रत्यारोपांचा काला

बैठकीतच दहीहंडी समन्वय समिती कोसळली; उरला आरोप-प्रत्यारोपांचा काला

Subscribe

गोविंदा पथकांना अंधारात ठेवून निवडक सदस्यांनी कुटुंबासह केलेली स्पेनवारी, समितीच्या सदस्यत्वासाठी अर्ज देण्यास टाळाटाळ, सदस्य संख्येवरून वाद, सदस्य नसलेल्या पथकांना बैठकीत बोलण्याची परवानगी नाकारणं अशा कारणांमुळे गोविंदा समन्वय समितीत वादाची हंडी फुटली आहे.

दंहीहंडी उत्सव साजरा करताना थर कोसळून होणाऱ्या अपघातात जखमी वा मृत गोविंदांच्या कुटुंबांना मदत करता यावी, गोविंदांच्या समस्या सोडवता याव्यात, राज्य सरकार, महानगरपालिका, आयोजकांबरोबर समन्वय साधता यावा या उद्देशाने दहीहंडी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली होती. परंतु आता या समितीत वादाची हंडी फुटली आहे. समितीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. 2018 मध्ये या समितीची धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीही करण्यात आली होती. त्यानंतर समितीची 12 सदस्यांची कार्यकारिणी निवडण्यात आली. (Dahihandi 2023 Controversy has erupted in the Govinda Coordinating Committee )

वादाची हंडी फुटण्यामागे कारण काय?

गोविंदा पथकांना अंधारात ठेवून निवडक सदस्यांनी कुटुंबासह केलेली स्पेनवारी, समितीच्या सदस्यत्वासाठी अर्ज देण्यास टाळाटाळ, सदस्य संख्येवरून वाद, सदस्य नसलेल्या पथकांना बैठकीत बोलण्याची परवानगी नाकारणं अशा कारणांमुळे गोविंदा समन्वय समितीत वादाची हंडी फुटली आहे.

- Advertisement -

दहीहंडी समन्वय समितीचे सदस्य परदेशी दौरे करताना आपल्या मर्जीतल्या पथकांनाच झुकतं माप देत होते. त्यात गेल्या वर्षी केलेल्या चौथ्या दौऱ्यावेळीही तेच झाल्यानं समन्वय समिती सदस्य आणि गोविंदा पथकांमध्ये शाब्दिक चकमकी उडू लागल्या. त्यामुळे वाद चिघळला आणि समन्वय समिती फुटली.

या समन्वय समितीच्या कार्यकारिणीची मुदत फेब्रुवारी 2023 मध्ये संपली. मात्र, कार्यकारिणीत सदस्यांची संख्या नेमकी किती असावी, यावर एकमत झालेलं नाही. काही जणांना तिच संख्या हवी होती कर काही जणांना सर्वसमावेशक सदस्य संख्या असावी, असं वाटत होतं. मात्र, त्यावर एकमत न झाल्यामुळे निवडणूक झाली नाही आणि नवी कार्यकारिणीही नियुक्त झाली नाही.

- Advertisement -

कोणाबरोबर किती मंडळे आहेत, असा प्रश्न विचारला असता उपाध्यक्ष पेंढारे यांनी आमच्यासोबत 300 पेक्षा अधिक मंडळे आहेत, असा दावा केला. तर सेक्रेटरी पांचाळ यांनी निश्चित संख्या सांगू शकत नाही, पण सोबत भरपूर आहेत, असा दावा केला.

( हेही वाचा: Helium Day: विजयदुर्ग किल्ल्यावर आज साजरा होणार जागतिक हेलियम दिवस )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -