घरमहाराष्ट्रआम्ही काळाबाजार केला असेल तर गुन्हा दाखल करा; दरेकरांचं राऊतांना आव्हान

आम्ही काळाबाजार केला असेल तर गुन्हा दाखल करा; दरेकरांचं राऊतांना आव्हान

Subscribe

रेमडेसिवीरवरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये राज्याच जुंपल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विरोधी पक्ष भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर हे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. या टीकेला प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही काळाबाजार केला असेल तर गुन्हा दाखल करा, असं खुलं आव्हान प्रवीण दरेकरांनी संजय राऊतांना दिलं आहे.

रेमडेसिवीरसंदर्भात ज्यांनी कोणी काळाबाजार झाला असेल तर गुन्हा दाखल करा आणि जेलमध्ये टाका. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा ब्रुक फार्माकडे कुलाही साठा नव्हता. आपल्या अपयशाचं फोकस प्रत्येक गोष्टींवरुन हलवण्याचा या सरकारचा प्रकार आहे. संजय राऊतांना आव्हा काळाबाजार असेल तर गुन्हा दाखल करा, असं खुलं आव्हान दरेकरांनी राऊतांना केलं आहे. आम्ही पाठीशी घालत असेल तर पुराव्यानिशी सिद्ध करा नाही तर तुम्ही माफी मागा, असं दरेकर म्हणाले. अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करुन लोकांच्या जीवाशी खेळताय, असा माझा आरोप आहे, असं दरेकर म्हणाले.

- Advertisement -

रेमडेसिवीर आणण्याची तुमची क्षमता नाही. तुम्हाला एक इंजेक्शन आणता येत नाही. आम्ही त्या राज्यात जाऊन इंजेक्शनची जबाबदारी घेतो, आम्ही काय भाजपचं टेबल लावून विकणार नव्हतो. अन्न व प्रशासान मंत्री राजेंद्र शिंगणे यांना मी त्या मालकाला घेऊन भेटलो आहे. जी काही रेमडेसिवीर आणणार आहोत, ती तुम्हालाच देणार आहोत, असं सांगितलं होतं. त्याबाब रीतसर परवानगी घेतली आहे. मात्र, गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावरुन असं वाटतंय की याची काहीच माहिती नाही आहे. याबाबतची माहिती सरकारमधल्या नेत्याला, मंत्र्याला माहित नाही हे दुर्दैव आहे. अशा पद्धतीने औषध निर्मिती करणाऱ्या मालकाला घाबरवून उद्या जर इतर वितरकांनी पाय आखडता घेतला तर लोकांचा ऑक्सिजन किंवा इतर औषधांच्या पुरवठा न झाल्यामुळे जीव गेला तर त्याचे पाप कोण घेणार? असा सवाल त्यांनी ठाकरे सरकारला केला आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -