घरताज्या घडामोडीअखेर शिवसेनेला फसवल्याचे भाजप नेत्याची कबुली

अखेर शिवसेनेला फसवल्याचे भाजप नेत्याची कबुली

Subscribe

सभागृहात बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, होय आम्ही त्यांना फसवलं, आमची चूक झाली. आमच्या चुकीचा फायदा तुम्हाला झाला. पण एक ना एक दिवस ती चूक आम्ही सुधारू.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या आणि शिवसेनेने भाजपने जो शब्द दिला तो पाळला नसल्याचे सांगत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. शिवसेनेच्या या निर्णयानंतर भाजपकडून वारंवार टीका होत असताना आज खुद्द सभागृहात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी होय आम्ही त्यांना फसवलं असे म्हणत चक्क भाजपला घरचा आहेर दिला. दरम्यान सभागृहात बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, होय आम्ही त्यांना फसवलं, आमची चूक झाली. आमच्या चुकीचा फायदा तुम्हाला झाला. पण एक ना एक दिवस ती चूक आम्ही सुधारू, असे सांगत खुद्द स्वतःच्या पक्षाचा खोटेपणाच विधानसभा सभागृहासमोर आणला आहे.

दरम्यान मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात जे ठरलं तो शब्दच भाजपने फिरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना आज खुद्द सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांना टोला लगावताना खुद्द कबुली दिली.

- Advertisement -

काय म्हणालेत नेमकं सुधीर मुनगंटीवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी तुमची तीन महिन्याची मैत्री असेल, पण आमची मैत्री ३० वर्षांपासूनची जुनी आाहे. यावर सत्ताधारी पक्षातील सदस्यांकडून म्हणून फसवलं, अशी टिपणी आली असता. होय आम्ही त्यांना फसवलं, आमची चूक झाली, पण आमच्या चुकीचा तुम्ही फायदा घेतला असा टोमणा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांना मारतानाच ती चूक एक दिवस आम्ही सुधारू. एखादा जोतिरादित्य सिंधीया आमच्याकडे पुढील काळात येईल, अशी आशाही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -