घरताज्या घडामोडीऔषधांच्या दुकानात 'सॅनिटायझर' आणि 'एन-९५ मास्क'चा कृत्रिम तुटवडा!

औषधांच्या दुकानात ‘सॅनिटायझर’ आणि ‘एन-९५ मास्क’चा कृत्रिम तुटवडा!

Subscribe

सध्या करोनाचे सावट असल्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. त्यामुळे कळवा-खारेगावातील १३० औषधांच्या दुकानात 'सॅनिटायझर' व एन-९५ मास्क'चा कृत्रिम तुटवडा जाणवत आहे.

संपूर्ण जगाची झोप उडवणारा ‘करोना’व्हायरस मुंबईत येऊन धडकला असून मुंबईत आणि भिवंडीत संशयित रुग्ण सापडल्याने ठाणेकरांची झोप उडाली आहे. या रोगाचा सामना करण्यासाठी उपाययोजना म्हणून कळवा खारेगाव, विटावा परिसरातील सहा लाख लोकसंख्यासाठी असणाऱ्या या परिसरातील जवळपास १३० औषधाच्या दुकानांत या आजारावर स्वतःची काळजी घेण्यासाठी प्राथमिक उपाययोजना म्हणून वापरण्यात येणारे आणि बाहेरून घरी आल्यावर हात धुण्यासाठी वापरण्यात येणारा लिक्विड ‘सॅनिटायझर’, नाकाला लावण्यात येणारा ‘एन-९५ मास्क’च उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे.

मास्क आणि सॅनिटायझरसाठी दुकानात गर्दी 

‘करोना’पासून बचाव करण्यासाठी या परिसरातील अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना मास्क लावून येण्याच्या सध्या सूचना दिल्या आहेत. तसेच खबरदारी म्हणून अनेक नागरिक या परिसरातील औषधांच्या दुकानात सध्या ‘सॅनिटायझर’लिक्विड घेण्यासाठी आणि ‘एन-९५’ हा मास्क घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. मात्र या दुकानात ते उपलब्धच नसल्याने सध्या त्यांची गैरसोय होत आहे. सध्या ‘सॅनिटायझर’च्या सैव्हलॉन कंपनीच्या छोट्या नऊ मिली बाटलीची किंमत ४९ रुपये आहे. मोठी २० मिलीची १०० रुपये किंमत आहे. तर ‘एन-९५मास्क’ची किंमत ३५० रुपये आहे. मात्र या दोन्ही वस्तूंची किंमत जास्त असल्याने आणि देशभरात सध्या मागणी वाढल्याने मागणी करुनही मिळत नसल्याने ९९ टक्के दुकानात सध्या उपलब्ध नाहीत. फक्त हिरव्या रंगाचे साधे मास्क उपलब्ध असून ३० ते ४० रुपयांना विकले जात आहेत. तसेच काही ठिकाणी उच्च दर्जाचे मास्क ब्लॅकने १५० ते २०० रुपयांना विकले जातात.

- Advertisement -

सध्या मास्क आणि सॅनिटायझर दुकानात उपलब्ध नाही 

या परिसरातील अनेक भागात झोपड्यांचा भाग असून त्यामध्ये अनेक गरीब कुटूंब राहत आहेत. त्यापैकी बहुतांश लोकांना रोजगारासाठी मुंबई, भिवंडीमध्ये जावे लागत असल्याने सध्या मुंबई आणि भिवंडी मध्ये ‘करोना’चे संशयित रुग्ण मिळाल्याने सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. यापैकी कोणाला संसर्ग झाल्यास मोठा परिणाम होऊ शकतो. तसेच या भागात अनेक मोठ्या शाळा असून विद्यार्थ्यांना खबरदारी म्हणून मास्क आणि हात धुण्यासाठी लागणारे ‘सॅनिटायझर’ या दुकानात उपलब्ध नाहीत. विशेष म्हणजे या परिसरात ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असून या रुग्णालयात हजारो रूग्ण दाखल होतात. आधीच रुग्णालयातील औषधाचे दुकान बंद असल्याने परिसरातील औषधाच्या दुकानावर येथील रुग्णांना अवलंबून राहावे लागत आहे. मात्र या परिसरातील दुकानातही या दोन्ही वस्तू सध्या उपलब्ध नाहीत त्यामुळे या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची दुकानावर गर्दी होत आहे. या परिसरात शासनाने स्वस्त दरात खबरदारी म्हणून या वस्तू उपलब्ध करून द्यावी ही मागणी नागरिकांकडून होत आहे.

कळवा परिसरातील जवळपास ९० टक्के औषधाच्या दुकानदारांनी मागणी करूनही मास्क आणि ‘सॅनिटायझर’चा पुरवठा होत नाही. आम्ही संघटनेच्या वतीने शासनाकडे हे उपलब्ध व्हावे म्हणून मागणी करणार आहोत. – उत्तम पिसाट,अध्यक्ष

- Advertisement -

सॅनिटायझर’ आणि ‘एन-९५’ मास्क महाग असून ठेवायला परवडत नाही तसेच मागणी करूनही उपलब्ध होत नाही. – तानाजी हांडे, मालक, महालक्ष्मी मेडिकल, कळवा


हेही वाचा – महाराष्ट्रात आढळलेल्या करोनाच्या ११ रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नाहीत; सरकारी कार्यक्रम, यात्रा रद्द करा …


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -