घरमहाराष्ट्रनांदेडमध्ये गोळीबार; एकाचा मृत्यू, २ जण जखमी

नांदेडमध्ये गोळीबार; एकाचा मृत्यू, २ जण जखमी

Subscribe

नांदेडमध्ये दोन ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या असून या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी आहेत. याप्रकरणी नांदेड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

नांदेड शहरात दोन ठिकाणी गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. चोरीच्या उद्देशाने हा गोळीबार झाल्याचे समोर आले असून या घटनेमध्ये १५ लाखाच्या किंमतीची चार चाकी गाडी मारेकऱ्यांनी चोरल्याचे उघडकीस आले.

नेमके काय घडले?

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एक फोन आला. या फोनवर सांगण्यात आले की, दोन माणसांनी चार चाकी गाडीवर फायरिंग करुन त्यांना जखमी केले आहे. हा प्रकार विद्यापीठ, विष्णूपुरीजवळ घडल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना होत नाही तर पुन्हा दुसरा फोन आला की, विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या कार्यालयासमोर एक माणुस जखमी अवस्थेत पडला आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता एका माणसाच्या उजव्या काखेखाली गोळी लागली होती. शेख नजीब असे त्यांचे नाव असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. मात्र त्यांचा या गोळीबारात मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

तर दुसऱ्या घटनेमध्ये कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे राहणारे डॉ. सतिश प्रभाकरराव गायकवाड आपल्या आई, बहिणी, मुलगा आणि मित्र बशीर पठाण यांच्यासोबत कारने अहमदपुर येथून डोंगरकडा येथे जात होते. त्या दरम्यान रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन येणाऱ्या दोन युवकांनी कार अडवली. त्यातील एका हल्लेखोरांनी कारच्या काचेवर गोळी झाडली. काच फुटली आणि गोळी सतीश गायकवाड यांच्या पाठीवर लागून तिच गोळी चालक आणि गायकवाड यांच्या मित्राला लागली आणि या गोळीबारात ते जखमी झाले. गायकवाड यांच्या कुटुंबियांना बाहेर काढून गाडीची चावी मागितली. मात्र चावीला नकार देत गायकवाड कुटुंब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या पॉईंटवर पोहोचले. त्याठिकाणी पोहोचल्यानंतर तेथील लोकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी नांदेड पोलीस अधिक तपास करीत आहेत.


वाचा – कोल्हापुरात हल्लेखोरांनी आयपीएसवर रोखले पिस्तूल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -