घरमहाराष्ट्रटोलनाक्यावर पैसे देण्यावरुन वाद; गोळीबारात एक जखमी

टोलनाक्यावर पैसे देण्यावरुन वाद; गोळीबारात एक जखमी

Subscribe

साताऱ्यातील आनेवाडी टोलनाक्यावर पैसे देण्यावरुन झालेल्या वादात आरोपीने गोळीबार केला. या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे.

साताऱ्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. टोलनाक्यावर टोल न भरण्यावरुन वाद झाला आहे. या वादामध्ये टोलनाक्यावर गोळीबार करण्यात आला. साताऱ्याच्या आनेवाडी टोलनाक्यावर हा प्रकार घडला आहे. टोलचे पैसे देण्याच्या वाद झाला आणि आरोपीने टोलनाक्यावर गोळीबार केला. आरोपीने सात गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये एक जण जखमी झाला आहे. गोळीबारानंतर आरोपी फरार झाला आहे. सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे. गोळीबार करणाऱ्यांमध्ये कुख्यात गुंडाचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

सातारा महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर मध्यरात्री रोजी एक वाजता सातारा पुणे हायवेवरील टोल बूथ क्रमांक एक समोर स्विफ्ट कार नंबर एमएच 12 एन जे 302 ही कार टोल न भरता पळून जात होती. यावेळी या कारला टोल बूथवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अडवून धरले. या दरम्यान, या कारच्या पाठीमागून आलेल्या रिएट्स फॉर्च्यूनर या गाडीतील पाच ते सहा जणांनी त्यांच्यासमवेत असणाऱ्या रोहिदास उर्फ बापू चोरगे याने जिवे मारण्याच्या उद्देशाने टोल नाका कर्मचाऱ्यांच्यावर गोळीबार केला. संबंधित कर्मचारी जीव वाचवण्यासाठी पळून आडोशाला लपले. यातीलच एक कर्मचारी विशाल दिनकर राजे पळताना पडल्याने संबंधितांनी त्यास दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान व्‍यवस्‍थापक विकास शिंदे यांनी चोरगे याच्या हातातील पिस्तूल काढून घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी कर्मचाऱ्याला सातारा येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे. मध्यरात्री घडलेल्या प्रकारामुळे जिल्हा प्रशासन हादरले आहे. याबाबत भुईंज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -