घरताज्या घडामोडीसाखर कारखान्यात इथेनॉलपासून ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्रकल्प यशस्वी

साखर कारखान्यात इथेनॉलपासून ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्रकल्प यशस्वी

Subscribe

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी इथेनॉलपासून ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्रकल्प यशस्वी झाल्याची माहिती दिली

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे ऑक्सीजनची कमतरता निर्माण झाली आहे. ऑक्सीजनचा साठा उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडून मदत मागितली आहे. तसेच राज्यातच ऑक्सीजन निर्मिती करण्याचे पाऊल राज्य सरकारने उचलले आहे. यामध्ये अनेक जिल्ह्यांत हवेतून ऑक्सीजन निर्मिती करण्यात येत आहे. तर ज्या साखर कारखान्यांत इथेनॉल प्लांट आहे अशा साखर कारखान्यांनी ऑक्सीजनची निर्मिती करावी असे पत्र राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील सर्व साखर कारखान्यांना पाठवले होते. यानंतर आता इथेनॉलपासून ऑक्सीजन निर्मिती करण्याचा पहिला प्रकल्प उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशीव साखर कारखान्यात पूर्ण झाला आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी इथेनॉलपासून ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्रकल्प यशस्वी झाल्याची माहिती दिली आहे. एक महत्त्वाची टेक्नॉलॉजी डेव्हलप होत राहते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील सर्व साखर कारखान्यांना पत्र लिहिले होते. ज्यांच्याकडे इथेनॉल प्लांट आहेत त्यांनी ऑक्सीजनची निर्मिती करावी. त्यानंतर साखर संघाच्या वतीने आणि आरोग्य विभागाकडून जाणीवपुर्वक प्रयत्न करुन पाहिले की साखर कारखान्यांत कसा ऑक्सीजन निर्माण करता येईल त्यातला पहिला यशस्वी प्रयोग सोमवारी पुर्ण झाला आहे. तो पहिला यशस्वी प्रकल्प उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशीव साखर कारखान्यात पूर्ण झाला असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

- Advertisement -

धाराशीवमधील जो इथेनॉल प्लांट आहे तो साधारण ६० हजार केएलपीडीचा आहे. तर त्या ठीकणी एका खासगी कंपनीच्या टेक्नोलॉजीच्या सहाय्याने ऑक्सीजन निर्मिती करण्यात आली आहे. ४ मेट्रीक टन एका दिवसाला ऑक्सीजन निर्मिती केली जात आहे. म्हणजे साधारण दिवसाला ३०० सिलेंडर भरतील एवढा ऑक्सीजन निर्मिती करण्यात येत आहे. त्यांची असेही म्हटले आहे की, आम्ही दिवसाला ५०० सिलेंडर ऑक्सीजनची निर्मिती करु शकतो.

- Advertisement -

धाराशिवमध्ये मिळालेल्या यशानंतर आता ज्या साखर कारखान्यांत इथेनॉल प्लांट आहेत. त्यांना ऑक्सीजन निर्मिती करण्यास सांगितले जाईल. यामुळे राज्यातील ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण होईल. जे साखर कारखान्यात इथेनॉल प्लांट आहे आणि ते बंद असतील त्या कारखान्यांत ऑक्सीजनची निर्मिती राज्य शासनाकडून करण्यात येईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -