घरमहाराष्ट्रFlying kiss : पंतप्रधानांना चोळी-बांगडीचा आहेर पाठवण्याची हिंमत स्मृती इराणी करतील का?...

Flying kiss : पंतप्रधानांना चोळी-बांगडीचा आहेर पाठवण्याची हिंमत स्मृती इराणी करतील का? ठाकरे गटाचा हल्लाबोल

Subscribe

Flying kiss : मणिपूर हिंसाचारावरून (Manipur Violence) लोकसभेत मोदी सरकारविरोधात मांडलेल्या अविश्वास प्रस्ताव आज (10 ऑगस्ट) फेटाळण्यात आला आहे. परंतु या प्रस्तावावर बुधवारी (9 ऑगस्ट) सभागृहात चर्चा सुरू असताना महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी काँग्रेस नेते (Congress) राहुल गांधींवर (Rahul Gandhi) गंभीर आरोप केला की, भाषण संपवून संसदेबाहेर जाताना त्यांनी महिला खासदारांना लक्ष्य करत फ्लाइंग किस केले. यातून राहुल गांधींच्या कुटुंबाचे संस्कार दिसले, अशी टीकाही स्मृती इराणी यांनी केली होती. त्यांच्या आरोपानंतर देशभरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. अशातच शिवसेनेच्या (Shiv Sena) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी स्मृती इराणी यांच्यावरच हल्लाबोल केला आहे. (Flying kiss Will Smriti Irani dare to send a bodice bangle kiss to the Prime Minister Attack of Thackeray group)

हेही वाचा – राहुल गांधी Flying kiss : अजित पवार गटाच्या ‘या’ आमदारांनी केली पाठराखण

- Advertisement -

सुषमा अंधारे म्हणाल्या की, राहुल गांधी यांनी फ्लाइंग किस केलं म्हणत स्मृती इराणी यांनी घाणेरडा, गलिच्छ आणि विकृत आरोप केला आहे. त्यामुळे आम्हाला त्यांची कीव कराविशी वाटते. ज्या पद्धतीने त्या आणि भाजपा प्लाइंग किस प्रकरणी आक्रमक होत आहेत ते पाहून असा प्रश्न पडतो की, इतक्या दिवसांत मणिपूरप्रश्नी त्या किंवा भाजपाचा एकही मंत्री आक्रमक का नाही झाला? जर मणिपूरप्रकरणी वेळीच प्रश्न उपस्थित केले असते तर, आज विरोधकांवर अविश्वास प्रस्ताव आणायची वेळ आली नसती, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

हेही वाचा – Flying kiss : राहुल गांधींच्या कथित किसचा किस्सा; खासदार रजनी पाटील यांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

- Advertisement -

पंतप्रधानांना चोळी-बांगडीचा आहेर पाठवण्याची हिंमत स्मृती इराणी करतील का?

मनमोहन सिंह पंतप्रधान असताना निर्भया प्रकरण घडलं होतं. तेव्हा स्मृती इराणी यांनी मनमोहन सिंह यांना चोळी-बांगडीचा आहेर पाठवण्याची हिंमत केली होती. हीच हिंमत त्या पुन्हा करतील का? त्यांना मणिपूरमधील महिलांच्या प्रश्नांची त्यांना जाणीव असेल तर पंतप्रधानांना चोळी-बांगडीचा आहेर पाठवण्याची हिंमत स्मृती इराणी करतील का? निर्भया बलात्कार आणि हत्याकांडापेक्षा अत्यंत गलिच्छ घटना मणिपूरमध्ये दिवसाढवळ्या सर्वांसमोर घडली आहे, यावर स्मृती इराणी बोलतील का? असे प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -