घरमहाराष्ट्रकन्यारत्न झाल्याचा सोहळा; दोन हजार नागरिकांना दिला मोफत चहा

कन्यारत्न झाल्याचा सोहळा; दोन हजार नागरिकांना दिला मोफत चहा

Subscribe

पिंपरी-चिंचवडमध्ये एका कुटुंबात मुलगी झाल्याचा आनंद व्यक्त करत मोफत चहा वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि समाजात वेगळा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचे कुटुंबातील व्यक्ती सांगतात.

पिंपरी-चिंचवडमध्ये एका कुटुंबात मुलगी झाल्याचा आनंद व्यक्त करत मोफत चहा वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि समाजात वेगळा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचे कुटुंबातील व्यक्ती सांगतात. गुरुवारी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत या मोफत चहाचा आस्वाद तब्बल दोन हजार नऊशे नागरिकांनी घेतला आहे. कुटुंबात कन्यारत्न झाले आहे, असे आनंदाने तेथील कर्मचारी सांगत होते. चहा देत असताना गर्भातच मुलीची हत्या करू नये, असे आवाहन नागरिकांना यावेळी करण्यात आले.

चौगुले कुटुंबात दोन दिवसांपूर्वी मुलीने जन्म घेतला. तिचा सन्मान आणि आदर करत मोफत चहा देण्याची संकल्पना राऊत कुटुंबाने ठेवली. मोफत चहा देऊन त्यांनी मुलगी जन्माचे केलेले स्वागत आणि नागरिकांनी दिलेला प्रतिसाद खरंच कौतुकास्पद आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील रत्ना अमृतुल्य चहा सेंटरमध्ये मोफत चहा ठेवला होता, ते स्वप्नील चौगुले आणि अक्षय राऊत यांच्या मालकीचे आहे.

- Advertisement -

यावेळी अक्षय राऊत यांनी सांगितले की, समाजात स्त्रीभ्रूण हत्या होत आहेत. त्यांना रोखण्यासाठी हे छोटेसे पाऊल आहे. मुलगी झाल्यानंतर तिची हत्या न करता स्वागत करायला हवे. राखी बांधणाऱ्या हाताला गर्भातच मारून टाकू नका, जन्मानंतर तिचे स्वागत करावे, असे अक्षय म्हणाले.

महाराष्ट्रासह इतर राज्यातील नागरिक मुलगी झाली की नाक मुरडतात. मुलीला जन्म देतात, परंतू त्यानंतर मात्र तिच्या आईला मुलगा का होत नाही म्हणून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जातो. मुलगाच वंशाचा दिवा होऊ शकतो, असे समजले जाते. काही बहाद्दर गर्भातच मुलीला ठार मारतात. राज्य शासनाकडून मुलींसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. मात्र त्या अनेकदा फोल ठरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चौगुले आणि राऊत कुटुंबाने मुलगी जन्माचे स्वागत करण्यासाठी योग्य ते पाऊल उचलत केलेला उपक्रम हा कौतुकस्पद आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

अफगाणिस्तानमध्ये ५.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के

केरळ, कर्नाटकात पावसाचे थैमान; १६६ जणांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -