घरदेश-विदेशपाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; संयुक्त राष्ट्र संघात नाचक्की

पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; संयुक्त राष्ट्र संघात नाचक्की

Subscribe

संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडला आहे. काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पाकिस्तानचा हा प्रयत्न पुन्हा एकदा हाणून पडला आहे.

काश्मीर मुद्दावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सेद्दगिरी करुन भारताला एकटे पाडण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघात काश्मीर मुद्द्यावरुन बंद दरवाज्याआड चर्चा करण्यात आली. या बैठकीत पाकिस्तानला चजीन वगळता नऊ देशांचे समर्थन मिळाले नाही. त्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पडला. संयुक्त राष्ट्र संघात ही पहिली गोपणीय बैठक आयोजित करण्यात आली. तर काश्मीर मुद्द्यावरुन दुसऱ्यांदा संयुक्त राष्ट्र संघात बैठक आयोजित करण्यात आली. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद कुरेशी यांनी पत्राद्वारे संयुक्त राष्ट्र संघटनेला याबाबत बैठकीची मागणी केली होती. याशिवाय चीनने देखील संयुक्त राष्ट्र संघात बैठकीची विनंती केली. मात्र, संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानचा अपेक्षाभंग झाला.

हेही वाचा – काश्मीर मुद्यावरुन आज संयुक्त राष्ट्र संघात बैठक

- Advertisement -

स्थायी सदस्य देशांनी चीनला सुनावले

संयुक्त राष्ट्र संघात एकूण १५ सदस्य आहेत. यामध्ये ५ स्थायी तर १० अस्थायी सदस्य आहेत. अस्थाई सदस्यांचा कार्यकाळ फक्त काही वर्षांचा असतो, तर स्थायी सदस्य कायमस्वरुपी आहेत. स्थायी सदस्यांमध्ये अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रांस देश आहेत. तर अस्थाई सदस्यांमध्ये बेल्जियम, कोट डोमिनिक रिपब्लिक, इक्वेटोरियल गुएनी, जर्मीनी, इंडोनेशिया, कुवैत, पेरु, पॉलंड, साऊथ आफ्रिका या देशांचा समस्या आहेत. स्थायी सदस्यांपैकी चीन वगळता अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि फ्रांस या चारही देशांनी पाकिस्तानचे असमर्थन केले आहे. काश्मीर मुद्दा हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचा आंतरिक प्रश्न आहे. त्यामुळे दोन देशांनी मिळून चर्चा करुन हा मुद्दा निपटवावा, यात तिसऱ्या कुणाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, असेही या देशांनी चीनला सुनावले आहे. त्यामुळे पाकिस्तानला मोठा फटका बसला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -