घरमहाराष्ट्रगणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...राज्यभरात बाप्पाला जल्लोषात निरोप

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या…राज्यभरात बाप्पाला जल्लोषात निरोप

Subscribe

राज्यभरात दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज अनंत चतुर्दशीला  गणेश विसर्जन दिनी मोठ्या भक्तीमय वातावरणात भाविकांनी बाप्पाला निरोप दिला.

राज्यभरात दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन दिनी मोठ्या भक्तीमय वातावरणात भाविकांनी घरगुती आणि सार्वजनिक मंडळातील बाप्पाला निरोप दिला. यावेळी मुंबईत गिरगाव , दादर चौपाटीसह समुद्र किनाऱ्यावर बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांचा अथांग सागर उसळला होता. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत शेकडो भक्तांनी आपल्या आवडत्या बाप्पाच्या विसर्जनासाठी समुद्र किनारी एकच गर्दी केली होती.

मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुण्यासह राज्यभरात हाच उत्साह पाहायला मिळाला. बाप्पाच्या निरोपासाठी सकाळपासूनच लेझीम, ढोल ताशाच्या गजरात मिरवणूका निघाल्या होत्या. लालबागचा राजासह अनेक गणेश मंडळांचे गणपती दुपारी ११ च्या सुमारासच विसर्जनासाठी मार्गस्थ झाले होते.  त्यातच गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेल्या पावसाने आज सकाळपासूनच राज्यभरात दमदार हजेरी लावली होती. यामुळे पावसाच्या धारा अंगावर झेलतच भक्त बाप्पाच्या मिरवणूकीत मोठया संख्येने सामील होत होते. रात्री उशीरापर्यंत हा विसर्जन सोहळा सुरू होता. मात्र यादरम्यान मुंबई, ठाण्यासह पनवेल येथे काही ठिकाणी अप्रिय घटना घडल्याने गणेशोत्सवाला गालबोट लागले. ठाण्यात गणपती मंडपावर झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. तर पनवेल येथे विसर्जन घाटावर ११ भाविकांना शॉक लागल्याची घटना घडली. जळगाव मध्येही विसर्जनावेळी एकाचा बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

दरम्यान यावर्षी सर्वच गणेश मंडळांमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भक्तांनी गर्दी केली होती. मुंबईत लालबागच्या राजालाही यावेळी सर्वाधिक गर्दी पाहायला मिळाली. असेच काहीसे दृश पुणे,ठाणे नाशिकसह इतर जिल्ह्यातही पाहायला मिळाले. कोरोनामुळे गेली दोन वर्ष सगळ्याच सण उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र यावर्षी कोरोना नियंत्रणात असल्याने हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यामुळे बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्यभरात जनसागर उसळला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -