घरमहाराष्ट्ररावण टोळीतील कुख्यात गुंड चिम्या पिस्तुलासह अटकेत

रावण टोळीतील कुख्यात गुंड चिम्या पिस्तुलासह अटकेत

Subscribe

रावण टोळीतील कुख्यात गुंड टोळीचा सदस्य चिम्या उर्फ अमोल निजाप्पा गायकवाड याला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तुल ही हस्तगत केले आहे. चिम्या हा २०१७ पासून मोक्का मध्ये फरार होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावण टोळी ने पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी, आकुर्डी, वाकड, रावेत अश्या विविध ठिकाणी काही वर्षांपासून उच्छाद मांडलेला आहे. या टोळीने परिसरात दहशत निर्माण केली होती. लोकांच्या मनात भीती आहे. या टोळीतील अनेक सदस्यांनी वाहनांची तोडफोड केलेली आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल आहेत. अश्या घटना वाढल्याने विनोद गायकवाड याच्यावर आणि त्याच्या साथीदारांवर मोक्काची कारवाई केली होती. त्यानंतर त्याचा भाऊ चिम्या सक्रिय झाला होता त्याच्यावर ही मोक्का नुसार कारवाई केली.

- Advertisement -

चिम्या मागील काही दिवसांपासून ससा गायकवाड, सोन्या जाधव, नझीम व अन्य साथीदारांना घेऊन टोळी चालवत होता. त्यामुळे त्याला जेरबंद करणे गरजेचे होते. दरम्यान चिम्या हा देहूरोड जवळील चिंचोली गावाजवळ येणार असल्याची महिती देहूरोड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल मिळाले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गज्जेवार, उपनिरीक्षक जगताप, गायकवाड पोलीस कर्मचारी शाम शिंदे, प्रीतम वाघ, राजेश कुरणे, परदेशी, खोमणे यांच्या पथकाने केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -