घरमनोरंजन'तान्हाजी'च्या ट्रेलरवर भन्नाट मिम्स व्हायरल!

‘तान्हाजी’च्या ट्रेलरवर भन्नाट मिम्स व्हायरल!

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात महाराजांइतकेच त्यांच्या मावळ्यांचे पराक्रम आजही सांगितले जातात. याच शिवकालीन इतिहासात महाराजांचा एका मावळ्याचा पराक्रम सर्वश्रृत आहे. तान्हाजी मालूसरे या मावळ्याच्या पराक्रमाची कथा बॉलिवूडमध्ये अभिनेता अजय देवगण ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण तानाजींची भूमिका साकारत असून अभिनेत्री काजोल तान्हाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. अभिनेता सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर मराठमोळा अभिनेता शरद केळकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच सोशलमिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे. पण आता नेटकऱ्यांनी चित्रपटावर भन्नाट मीम्स तयार केले आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -