घरमनोरंजनHacked डेब्यू चित्रपटात 'या' भूमिकेत दिसणार हिना खान

Hacked डेब्यू चित्रपटात ‘या’ भूमिकेत दिसणार हिना खान

Subscribe

या चित्रपटाची शुटिंग नुकतीच संपली असून ३१ जानेवारी २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार

टीव्ही अभिनेत्री हिना खान मालिकांमधून अनेक प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर आता बॉलिवूड चित्रपटात आपले पदार्पण करणार आहे. हिना खान विक्रम भट्ट दिग्दर्शित हॅक्ट (Hacked) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची शुटिंग नुकतीच संपली असून ३१ जानेवारी २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

हा थ्रिलर चित्रपट असून डिजिटल, सोशल मीडियावर आणि सायबरक्राईमवर आधारलेला आहे. या चित्रपटात असे दाखवण्यात आले आहे की, प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करणे आपल्यासाठी किती धोकादायक असू शकते. हिना खान यामध्ये एका ग्लॅमरस फॅशन मॅग्झीनची संपादिका दाखवण्यात आली आहे.

- Advertisement -

अमर पी ठक्कर आणि कृष्णा भट्ट निर्मित असणाऱ्या या चित्रपटात हिना खान, रोहन शाह, मोहित मल्होत्रा आणि सिद मक्कर हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘कसौटी जिंदगी की’ ही हिंदी मालिका हिनाची शेवटची मालिका होती. तसेच ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘खतरों के खिलाड़ी’ आणि’बिग बॉस’मध्ये देखील ती दिसली होती. त्यानंतर ती मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.


Gold Awards 2019: सनीने जिंकला ‘हा’ पुरस्कार तर हिनाने जिंकले ३ पुरस्कार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -