घरमहाराष्ट्रत्या' व्हिडिओवर पहिल्यांदाच व्यक्त झाली गौतमी; रडून सांगितला 'तो' प्रसंग

त्या’ व्हिडिओवर पहिल्यांदाच व्यक्त झाली गौतमी; रडून सांगितला ‘तो’ प्रसंग

Subscribe

जेव्हा हा व्हिडीओ समोर आला तेव्हा एक क्षण मला काय करावे कळत नव्हते, पण मग मी आधी हा व्हिडिओ माझ्या आईला पाठवला. याचं कारण म्हणजे इतर कोणी तिला हा व्हिडीओ पाठवला असता तर ते बघून तिला सहन झालं नसतं म्हणून तिला कल्पना देण्यासाठी मी स्वत: तिला हा व्हिडीओ पाठवला.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलत असताना लपून व्हिडीओ काढण्यात आला होता. तसेच, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. जेव्हा हा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा गौतमी पाटील हिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. परंतु आता पहिल्यांदाच गौतमी पाटील हिने त्या व्हिडीओबाबत भाष्य केले आहे. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिने प्रसंग सांगितला आहे. याबाबत बोलताना गौतमी भावूकदेखील झाली.Gautami Patil told about viral video while dress changing on Youtube channel interview pup

@theoddengineer या युट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत गौतमीने या व्हायरल व्हिडीओबाबत सांगितले आहे.

- Advertisement -

….म्हणून आईला तो व्हिडीओ मी स्वत: पाठवला

गौतमी पाटील हीने @theoddengineer या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने व्हायरल झालेल्या व्हि़डीओबाबत भाष्य केले आहे. ती म्हणाली, जेव्हा हा व्हिडीओ समोर आला तेव्हा एक क्षण मला काय करावे कळत नव्हते, पण मग मी आधी हा व्हिडिओ माझ्या आईला पाठवला. याचं कारण म्हणजे इतर कोणी तिला हा व्हिडीओ पाठवला असता तर ते बघून तिला सहन झालं नसतं म्हणून तिला कल्पना देण्यासाठी मी स्वत: तिला हा व्हिडीओ पाठवला.

ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ काढला, त्या व्यक्तीवर गौतमीने राग व्यक्त केला. तसेच, खडे बोलही सुनावले. गौतमी पाटील म्हणाली की, माझी प्रसिद्धी पाहावली नाही त्या व्यक्तीला. माझे शो बंद करायचे होते, नेमक्या काय कारणासाठी त्या व्यक्तीने हा प्रकार केला मला माहिती नाही पण यातून त्याची मानसिकता किती खराब आहे हे दिसून येते, मी चुकले पण त्यानंतर नवी सुरुवात करण्यासाठी मी अगदी नवी साडी शिवण्यापासून तयारी केली, पण काहींना ते बघवलं नाही, असं गौतमी पाटील यावेळी म्हणाली.

- Advertisement -

( हेही वाचा: खुनी प्रियकराशी लग्नगाठ बांधण्यासाठी प्रेयसीची हायकोर्टात धाव )

गौतमी पाटील हिने त्या व्हायरल व्हिडीओच्या वेळी स्वत:ची झालेली मानसिक स्थिती तीने कथन केली. ती म्हणाली, जेव्हा व्हायरल व्हिडीओचे प्रकरण झाले त्यानंतरच्या शोमध्ये मनात धाकधूक होती कोणी काही कमेंट करेल का असे वाटत होते पण मला शोच्या आयोजकांनी, माझ्या सह डान्स करणाऱ्या अन्य मुलींनी आणि माझ्या महाराष्ट्रातील चाहत्यांनी धीर दिला, त्यातही पहिल्या एंट्रीला खूप घाबरले होते पण मग मी प्रेक्षकांना खुश करायचे हे एकच मनात ठेऊन एंट्री घेतली व स्टेज दणाणून सोडला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -