घरदेश-विदेशखुनी प्रियकराशी लग्नगाठ बांधण्यासाठी प्रेयसीची हायकोर्टात धाव

खुनी प्रियकराशी लग्नगाठ बांधण्यासाठी प्रेयसीची हायकोर्टात धाव

Subscribe

मला त्याच्याशी लग्न करायचे आहे त्याला कृपया पेरोलवर सोडा, अशी विनंती करत एका तरुणीने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

जज साहेब, माझ्या प्रियकराची सुटका करा, नाहीतर मला कोणीतरी दुसरं घेऊन जाईल, माझ्या घरचे माझं लग्न कोणी दुसऱ्याशी करतील, अशी एका तरुणीने न्यायाधीशांना विनंती केली आहे. मला त्याच्याशी लग्न करायचे आहे त्याला कृपया पेरोलवर सोडा, अशी विनंती करत एका तरुणीने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

या महिलेचे 9 वर्षांपासून खुनाच्या आरोपात दोषी असलेल्या पुरुषावर प्रेम आहे आणि तिला त्याच्याशी लग्न करायचे आहे. हत्येच्या गुन्ह्यात हा तरुण 10 वर्षांची शिक्षा भोगत आहे. तिच्या प्रियकराला 15 दिवसांच्या पेरोलवर सोडण्यात यावे, जेणेकरून तो तिच्याशी लग्न करू शकेल, अशी विनंती महिलेने न्यायाधीशांसमोर केली. A young woman has approached the Karnataka High Court requesting release her bf on parole as she wants to marry him pup

- Advertisement -

तरुणीची भावी सासूकरवी याचिका दाखल

30 वर्षीय नीता हिने तिच्या भावी सासूसह ही याचिका न्यायालयात दाखल केली होती. या 15 दिवसांच्या पेरोलवर माझा प्रियकर आनंद हा कायदा आणि पोलीस अडचणीत येतील असे कोणतेही कृत्य करणार नाही, अशी हमी तिने न्यायालयाला दिली आहे.

न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांनी या प्रकरणाची सुनावणी केली आणि नीता आणि आईची बाजू ऐकून न्यायमूर्ती भावूक झाल्या. त्यांनी तुरुंग प्राधिकरणाला आनंदला किमान 15 दिवसांच्या पेरोलवर सोडण्याचे आदेश दिले. जेणेकरून तो नीताशी लग्न करू शकेल. यासोबतच या काळात त्यांनी कोणतीही अडचण निर्माण होईल, असे कोणतेही काम करू नये, असे न्यायालयाने कडक शब्दात सांगितले.

- Advertisement -

लग्नासाठी पेरोलवर सोडणे चुकीचे

या प्रकरणी सरकारी वकिलांनी नीता आणि तिच्या आईच्या याचिकेला विरोध करत आनंद एका खुनाच्या प्रकरणात दोषी असल्याचे म्हटले आहे. लग्नासाठी पेरोलवर सोडणे योग्य नाही. त्यांनी स्पष्ट केले की, असा कोणताही कायदा नाही की ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला लग्नासाठी पेरोलवर सोडता येईल. खून करणाऱ्याने दुसऱ्याच्या लग्नाला हजेरी लावली असती तर गोष्ट वेगळी असती, असे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे. परंतु, न्यायमूर्ती नागप्रसन्ना यांनी अपवादात्मक परिस्थितीत मी पेराॅल मंजूर करत आहे, असे सांगत 5 ते 20 एप्रिल असा पेराॅल खुनात दोषी असलेल्या आनंदला मंजूर केला आहे.

5 ते 20 एप्रिलपर्यंत मिळाला पेरोल

सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृह नियमांच्या कलम 636 अन्वये पेरोल मिळविण्याच्या हेतूने कैद्याच्या सुटकेचा लाभ निश्चित केला जाणार नाही. तुरुंग नियमांच्या कलम 636 मधील उपकलम 12 संस्थेच्या प्रमुखास इतर कोणत्याही अपवादात्मक परिस्थितीत पेरोल मंजूर करण्याची परवानगी देते.

न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, संबंधित कैद्याला सोडणे अनिवार्य आहे, अन्यथा त्याचे प्रेम तो गमावेल. तुरुंगात असल्याने प्रेयसीने दुसऱ्याशी लग्न केल्याचे दुःख तो सहन करू शकणार नाही. त्यामुळे याचिकाकर्त्याने लादण्यात येणा-या कोणत्याही अटींच्या अधीन राहून आपत्कालीन पॅरोलची मागणी केली आहे. न्यायालयाने आनंदला ५ एप्रिलच्या सकाळपासून २० एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत पेरोलवर सोडण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -