घरमहाराष्ट्र२००२ च्या घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला अटक

२००२ च्या घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला अटक

Subscribe

२००२ च्या घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गुजरात एटीएसने औरंगाबाद येथून अब्दुल रहमान खानला अटक केली आहे. जवळपास १६ वर्षापासून अब्दुल फरार होता. आजारी पत्नीला भेटण्यासाठी औरंगाबादला आले असता त्याला अटक करण्यात आली आहे.

२००२ साली मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपीला तब्बत १६ वर्षानंतर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गुजरात एटीएसने स्थानिक एटीएसच्या मदतीने औरंगाबाद येथून अब्दुल रहमान खान या आरोपीला अटक केली आहे.

आजारी पत्नीला भेटण्यासाठी आला होता

४३ वर्षाचा अब्दुल रहमान खान हा २००२ पासून सौदी अरेबियामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरचे काम करत होता. ५ ऑगस्टला अब्दुल आजारी पत्नीला भेटण्यासाठी औरंगाबादला आला होता. याबाबत गुजरात एटीएसला माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर त्यांनी औरंगाबादच्या कैसर कॉलनीमध्ये सापळा रचून अब्दुलला अटक केली आहे.

- Advertisement -

घाटकोपर येथे बसमध्ये केला होता बॉम्बस्फोट

अटक केलेल्या अब्दुलला गुजरात एटीएस पथक मुंबई पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. २ डिसेंबर २००२ ला घाटकोपर रेल्वे स्टेशनबाहेर बस स्टॉपवर उभ्या असलेल्या बसमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आला होता. या स्फोटामध्ये ३२ जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटामध्ये बेस्टसह सार्वजनिक मालमत्तेचे जवळपास साडेपाच लाखांचे नुकसान झाले होते. या गुन्हातील आणखी ९ आरोपी अद्यापही फरार असून पोलिसांकडून शोध सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -