Eco friendly bappa Competition
घर क्राइम माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला सोडणार नाही म्हणत प्रेयसीचा प्रियकरावर चाकूहल्ला

माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला सोडणार नाही म्हणत प्रेयसीचा प्रियकरावर चाकूहल्ला

Subscribe

जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात एक घटना समोर आली आहे. एका प्रेयसीने लग्नाला नकार देणाऱ्या तिच्या प्रियकरावर चाकूहल्ला केल्याची घटना उघडकीस आली असून, यामध्ये नीलेश बोरसे हा तरुण जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

जळगाव : प्रेम आंधळं असतं असं आपण नेहमी म्हणतो, याच प्रेमातून आता मोठे-मोठे गुन्हे घडत असल्याचे समोर येत आहे. कारण,मागील काही दिवसांपासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत घडलेल्या काही घटनांचा आढावा घेतल्यानंतर हे लक्षात येते. यादरम्यान जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात घडलेल्या एक घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे.(Girlfriend stabs boyfriend saying marry me or I wont leave you)

जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात एक घटना समोर आली आहे. एका प्रेयसीने लग्नाला नकार देणाऱ्या तिच्या प्रियकरावर चाकूहल्ला केल्याची घटना उघडकीस आली असून, यामध्ये नीलेश बोरसे हा तरुण जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

दोन ते तीन वर्षापासून होते प्रेमसंबंध

- Advertisement -

पाचोरा येथील रहिवासी असलेला नीलेश बोरसे याचे एका तरुणीशी मागील दोन ते तीन वर्षापासून प्रेमसंबंध होते. मात्र, दोघांमध्ये मागी काही दिवसांपासून सातत्याने खटके उडत होते. नीलेश बोरसे याच्याकडे तरुणी लग्न करण्याची मागणी करत होती परंतू तो लग्न करण्यास टाळाटाळ करत होता. याच कारणावरून दोघांमधील वाद विकोपाला गेल्याने शनिवारी चाकूहल्ल्याची घटना घडली.

हेही वाचा : प्रदीप कुरुलकर यांची पॉलिग्राफ, व्हाइस लेयर चाचणी करण्यास नकार; पुणे न्यायालयाचा निर्णय

याआधी केली होता फसवणुकीचा गुन्हा दाखल

- Advertisement -

नीलेश बोरसे हा लग्नासाठी नकार देत असल्याने त्याच्या प्रेयसीने काही महिन्यापूर्वीच पाचोरा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात फसवणूक केल्याची तक्रार करत गुन्हा दाखल केला होता. तक्रार केल्यानंतरही नीलेशने लग्नासाठी होकार न दिल्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : राज्यातील आदिवासीबहूल शाळांमधील विद्यार्थी होणार हायटेक; ‘नमो’ कार्यक्रमांतून मिळणार गती

नीलेश बोरसेवर उपचार सुरू

लग्नासाठी टाळाटाळ करणाऱ्या नीलेश बोरसे याच्या घरी जात त्या तरुणीने माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला आणि तुझ्या परिवाराला सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतरही नीलेशने प्रतिसाद न दिल्याने त्याच्यावर चाकूहल्ला केला. यामधे तो जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेनंतर तरुणीविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिला अटक करण्यात आली आहे.

एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या

जळगावातील घटना ताजी असतानाच पंढरपूरमध्ये महाविद्यालयीन तरुणीची निर्घुण हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. हत्या झालेल्या मुलीचे वय 18 एवढे असून, हत्या करणाऱ्या सचिन मारुती गडदे या संशयीताविरुद्ध तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो सध्या फरार आहे.

- Advertisment -